विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात के. के. शैलजा यांना स्थान मिळाले नाही यावरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. तसेच प्रचंड टीकाही होत आहे.No interfere in kerala govt.
त्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे ‘माकप’चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शैलजा यांनी त्यांची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आता नव्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्जही याही प्रभावीपणे काम करतील. पश्चिेम बंगालमध्ये पूर्वी सलग सात वेळा डाव्यांचे सरकार सत्तेवर असतानाही पॉलिट ब्युरोने कधीही त्यात ढवळाढवळ केली नव्हती.
नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाच्या राज्य समितीचा असून आम्ही त्याचे पालन करू.राज्याच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयात विजयन यांची मनमानी दिसून येते,
अशा तक्रारी आहेत, याबद्दल थेट उत्तर न देता केरळमध्येा ५० वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांचा कम्युनिस्ट पक्षाचे सरकार येणे ही, ऐतिहासिक गोष्ट आहे.