• Download App
    नो शेक हँड्स : आधी मागे हटा, मग संबंध सुधारू; चिनी संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंहांचा कडक इशारा!!|No improvement in overall ties till LAC standoff is resolved Rajnath strong message to China

    नो शेक हँड्स : आधी मागे हटा, मग संबंध सुधारू; चिनी संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंहांचा कडक इशारा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नो शेक हँड्स : चिनी संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंहांचा कडक इशारा!!, हे राजधानी नवी दिल्लीत आज घडले आहे. शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने सदस्य देशांचे संरक्षण मंत्री राजधानी नवी दिल्लीत आले आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची पहिली परिषद झाली आहे. त्याच वेळी सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी राजनाथ सिंह यांनी स्वतंत्र वाटाघाटी केल्या आहेत. यापैकी चिनी संरक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षण मंत्र्यांशी शेक हँड्स अर्थात हस्तांदोलन केले नाही. त्याच वेळी चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार नाही, स्पष्ट शब्दांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षण मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे.No improvement in overall ties till LAC standoff is resolved Rajnath strong message to China

    चीनचे संरक्षण मंत्री ली शँगफू शांघाय सहकार्य परिषदेच्या संस्थांच्या परिषदेसाठी भारतात आले आहेत. चीन बरोबरच रशिया, कझाकस्तान, किरगीस्तान, इराण, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आदी सदस्य देशांचे संरक्षण मंत्री हे भारतात आले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री या बैठकीत इस्लामाबाद मधूनच ऑनलाइन सहभागी झाले होते.



    पण चीन सोडून बाकीच्या देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी राजनाथ सिंह यांनी सेकंड अर्थात हस्तांदोलन केले, पण चिनी संरक्षण मंत्री ली शँगफू यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. यातून चीनला प्रतीकात्मक संदेश तर दिलाच, पण त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष द्विपक्षीय चर्चेत राजनाथ सिंह यांनी लडाख मधल्या चिनी घुसखोरी बाबत चिनी संरक्षण मंत्र्यांना कठोर शब्दात सुनावले. डेपसांग, डेमचोक, गलवान परिसरातून चिनी सैन्य मागे हटलेले नाही. कोणते ना कोणते कारण काढून ते तिथेच तळ ठोकून बसले आहे, हे भारत सहन करणार नाही. जोपर्यंत चिनी सैन्य सकारात्मक पावले उचलून मागे वाटत नाही तोपर्यंत भारत – चीन संबंधात सकारात्मक सुधारणा होणार नाहीत, असे राजनाथ सिंह यांनी सुनावले.

    भारत – चीन द्विपक्षीय बैठकी आधी चिनी संरक्षण मंत्रालयाकडून भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडे संरक्षण सहकार्य विषयक प्रस्ताव आला होता. मात्र तो प्रस्ताव स्वीकारायला भारताने ठाम नकार दिला आहे. भारताने त्याचे कारणही चिनी घुसखोरीचेच दिले असून चीनचे कोणतेही संरक्षण सहकार्याचे असले कोणतेही प्रस्ताव भारत तोपर्यंत स्वीकारणार नाही, जोपर्यंत चिनी सैन्य आपल्या हद्दीत परत जात नाही, असे राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठकीत स्पष्ट केले आहे.

    चीनबरोबर काँग्रेसलाही “संदेश”

    चीन पुढे मोदी सरकार नांगी टाकते. आपली चीनने आपली बळकावलेली जमीन मोदी सरकार परत घेत नाही, असे आरोप काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी नेहमीच करत असतात. पण शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रोटोकॉल नुसार जी राजकीय वर्तणूक चिनी संरक्षण मंत्र्यांना दिली, त्यातून एक कडक संदेश मोदी सरकारने चीनला देऊन टाकला आहे. त्यातही इतर सर्व देशांच्या संरक्षण मंत्र्यांना मंत्र्यांशी द्विपक्षीय वाटाघाटी करताना राजनाथ सिंह यांनी त्यांच्याशी आवर्जून शेक हँड अर्थात हस्तांदोलन केले आहे. पण चिनी संरक्षण मंत्र्यांबरोबर नेमके तेच टाळले आहे, याची आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    No improvement in overall ties till LAC standoff is resolved Rajnath strong message to China

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य