• Download App
    कोरोना शिरू नये म्हणून गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन, ८० जणांना अटक।No follow rule of lockdown in procession

    कोरोना शिरू नये म्हणून गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन, ८० जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद – गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल ८० पेक्षा जास्त नागरिकांना अटक करण्यात आली. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज तालुक्यातील लालपूरमध्ये गेल्या शनिवारी (२२ मे) रोजी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. No follow rule of lockdown in procession

    पोलिसांना मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर याचा पत्ता लागला. त्यानंतर ओळख पटलेल्या २८ जणांविरुद्ध आणि शंभरहून जास्त अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर कारवाई सुरु असून कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत ८३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांसह सहभागी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक विधी करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत काही लोकांनी ढोल वाजविले, तर महिलांसह काही जणांनी डोक्यावर कलश घेतले होते. त्यातील पाणी पवित्र असल्याची त्यांची श्रद्धा होती. याआधी अहमदाबाद जिल्ह्यात या महिन्याच्या प्रारंभी नवापुरा गावात असाच प्रकार आढळला होता. येथे काढलेल्या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते.

    No follow rule of lockdown in procession

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!