• Download App
    यापुढे कोणतीही निवडणूक रणरणत्या उन्हात नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची ग्वाही!! No election is in the summer anymore

    यापुढे कोणतीही निवडणूक रणरणत्या उन्हात नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची ग्वाही!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका आपल्या नियोजित वेळेनुसार पण रणरणत्या उन्हात झाल्या. यावेळी संपूर्ण देशभर उन्हाचा चटका सर्वाधिक तीव्र होता. त्याचा फटका निवडणूक कर्मचाऱ्यांना बसला. काही निवडणूक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संपूर्ण देशाला ग्वाही दिली, ती म्हणजे इथून पुढे रणरणत्या उन्हात कोणतीही निवडणूक घेतली जाणार नाही. निवडणुकीची प्रक्रिया उन्हाळ्याच्या महिन्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. No election is in the summer anymore

    राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणुकीची सगळी वैशिष्ट्ये देशासमोर मांडली

    राजीव कुमार म्हणाले :

    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच निवडणूक यंत्रणांनी चांगली कामगिरी केली. देशात तब्बल 64 कोटी 20 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 31 कोटी 20 लाख महिला होत्या. मतदानाचा हा जागतिक विक्रम झाला.

    परंतु या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या. निवडणूक रणरणत्या उन्हात घेतली गेली. यापुढे महिनाभर आधी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच आमच्याविरोधात फेक न्यूरेटीव्ह राबवण्यात आले. त्यावर आम्ही काहीच करु शकलो नाही.

    जम्मू-काश्मीरमध्येही लवकरच निवडणुका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या बाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघायला नको अशी आमची भूमिका होती.

    जम्मू – काश्मीरमध्ये लवकर निवडणुका

    जम्मू – काश्मीरमधे 58.51 % मतदान झाले. त्या ठिकाणी अनेक रांगा मतदानासाठी दिसल्या. यामुळे जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभेसाठी आता आम्ही लवकरच मतदान घेणार आहोत. मणिपूरमध्ये 94 स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते. ही आमच्यासाठी सक्सेस स्टोरी आहे.

    2 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता या निवडणुका झाल्या आहेत. यापूर्वी निवडणूक दरम्यान किती हिंसाचार होतात, हे आपण पाहिले होते. परंतु या निवडणुका शांततेत झाल्या आहेत. पैसे, दारू वाटल्याच्या घटना घडत होत्या. यावेळी एकही मोठी घटना समोर आली नाही.

     4391 कोटींचे ड्रग्स जप्त

    4391 कोटींचे ड्रग्स या काळात आम्ही जप्त केले आहे. निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी 135 ट्रेन सुरु होत्या. त्या ट्रेन निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जात होत्या. तसेच 1692 हेलिकॉप्टरने कर्मचारी पोहोचविले जात होते. देशातील असा कुठलही कोपरा नाही की ज्या निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत.

    बंगालमध्ये 7 टप्प्यात मतदान झाले. तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला नाही. मणिपूरमध्येही शांततेत मतदान प्रक्रिया झाली. जम्मू काश्मीरमध्ये आशादायक चित्र आहे. या ठिकाणी लोकांचा लोकशाहीवर विश्वास दिसला. त्यामुळे लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये लवकर निवडणूक होणार आहे. आयोग लवकरच या ठिकाणी निवडणूक जाहीर करेल.

    No election is in the summer anymore

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य