अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर जोरादार निशाणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील दोन दिवस यावरून संसदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, विरोधकांनी सरकारवर प्रचंड टीका केली सत्ताधारी खासदारांनीही त्याला उत्तर दिले, अखेर आज पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. No confidence motion of the opponents is good for us 2024 will come back to power with a huge majority Prime Minister Modi spoke and showed faith
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अविश्वास प्रस्ताव हा देवाचा आशीर्वाद आहे. मोदी म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव ही विरोधकांची कसोटी आहे. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. यावेळीही जनतेच्या भव्य आशीर्वादाने आम्ही परत सत्तेत येऊ. तसेच, आज मी पाहतोय की तुम्ही (विरोधकांनी) ठरवले आहे की, लोकांच्या आशीर्वादाने मागील सर्व विक्रम मोडून एनडीए आणि भाजपाला दणदणीत विजयासह परत सत्तेत आणायचं. तसेच, भ्रष्टाचार्यांसाठी विरोधक एक झाले आहेत.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
याशिवाय ”ज्यांचे स्वत:चे हिशेब चुकलेत, तेही आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरतायत. विरोधी पक्षांना हेच सांगेन, तुम्ही तयारी करून का येत नाहीत? २०१८ मध्येच मी तुम्हाला तयारी करून यायला सांगितलं होतं. तुम्हाला तयारीसाठी ५ वर्षं तयारीसाठी दिली, तरी काय हाल आहेत तुमचे. फिल्डिंग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार सत्ताधारी बाकांवरून लागले. विरोधी पक्ष अविश्वास ठरावावर नो बॉल करत पुढे चालत राहिला. इथून सेंच्युरी होत होती, तिथून नो बॉल होत होते. काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे दाखवून दिलंय की देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा आहे. विरोधकांना देशापेक्षा स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.” असंही मोदींनी म्हटलं.
याचबरोबर ”अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगलं झालं असतं. गेल्या काही दिवसांत या सभागृहानं अनेक महत्त्वाची विधेयकं पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता.” अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
No confidence motion of the opponents is good for us 2024 will come back to power with a huge majority Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??