तृणमूल कॉँग्रेसच्या विजयानंतर या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीतील निर्वाचन सदन म्हणजे निवडूक भवन हे नवीन स्मशानभूमी बनले आहे. भारतीय घटनेचे येथे दहन झाले आहे, असे त्या म्हणाल्या.Nivachan Sadan is new Cemetery in Delhi, Burning of Indian Constitution Here, Mahua Moitra alleges
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल कॉँग्रेसच्या विजयानंतर या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीतील निर्वाचन सदन म्हणजे निवडूक भवन हे नवीन स्मशानभूमी बनले आहे. भारतीय घटनेचे येथे दहन झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड विजय मिळविला. मात्र, निवडणूक आयोगावर दुगाण्या झाडणे त्यांनी सुरूच ठेवले आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक आठ टप्यांत घेतली.
केंद्र सरकारच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने हे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठीच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे, असे तृणमूल कॉँग्रेसचे म्हणणे आहे.
पश्चि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. आयोगाची कार्यपध्दती ही भीतीदायक होती, असे त्यांनी म्हटले होते.
Nivachan Sadan is new Cemetery in Delhi, Burning of Indian Constitution Here, Mahua Moitra alleges
महत्त्वाच्या बातम्या
- फायझर भारताला देणार ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत, प्रत्येक कोरोनाबाधिताला मिळणार मोफत औषधे
- योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
- मग शरद पवार, रोहित पवारांवरही कारवाई करा, खासदार सुजय विखे-पाटील यांची मागणी
- तृणमूल कॉँग्रेसच्या भीतीने बीरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबे रस्त्यावर, गुंडांकडून महिलांची छेडछाड
- तृणमूलच्या आमदाराचे दुर्दैव, मृत्यू झाल्यावर सात दिवसांनी त्यांचा विजय जाहीर झाला