विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवून अनेकांचे पत्ते कापले. त्यामुळे नितीश कुमार नाराज झाले आणि जनता दल युनायटेडचे खासदार बैठकीतून चहा बिस्किटे घेऊनच परतले!! Nitish Kumar’s MPs are disappointed because of no samosas in the I.N.D.I alliance meeting
त्याचे झाले असे :
दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेल अशोक मध्ये आघाडीचे बैठक झाली. त्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, नीतीश कुमार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, एम. के. स्टालिन या सगळ्यांचे “पापड मोडले”. बैठकीत आघाडीचा लोगो झेंडा अथवा एकच घोषणा याचा कुठलाही निर्णय झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध एकजुटीने लढायचे हा पहिल्याच बैठकीतला अजेंडा समोर ठेवून तसेच भाषणे झाली.
पण ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची गुगली टाकल्याने नितीश कुमार सर्वाधिक नाराज झाले. कारण ते आघाडीचा संयोजक बनण्यासाठी उतावीळ आहेत. आघाडीच्या संयोजक बनून त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची घाई झाली आहे. पण या सगळ्यावर ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खर्गेंचे नाव पुढे करून क्षणार्धात पाणी फिरवले.
त्यामुळे नितीश कुमार यांच्या जदयूचे खासदार नाराज झाले आणि त्यांनी त्या बैठकीतली सगळी भडास बाहेर काढली. आघाडीच्या बैठकीत कुठलीही गंभीर चर्चा झाली नाही. फक्त चहा – बिस्किटांवरच सगळ्या नेत्यांची बोळवण केली. सामोसे देखील खायला दिले नाहीत. बैठकीत गंभीर मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही, असे जडयूचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
काँग्रेस कडे सध्या निधीची कमतरता आहे. सध्या त्यांचे नेते 138, 1338 किंवा 13038 अशा रुपयांमध्ये चंदा मागत आहेत. त्यामुळे बैठकीत फक्त चहा आणि बिस्कीटेच दिली. सामोसा आलाच नाही, असा टोला सुनील कुमार पिंटू यांनी हाणला. पिंटू यांच्या या टोल्यामुळे खूप मोठा खर्च करून अशोका सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये INDI आघाडीची
बैठक घेऊनही ती वाया गेली.
Nitish Kumar’s MPs are disappointed because of no samosas in the I.N.D.I alliance meeting
महत्वाच्या बातम्या
- कोची रुग्णालयांमध्ये फ्लू सारख्या आजाराने ग्रस्त 30 टक्के लोक COVID-19 पॉझिटिव्ह
- देशात JN.1 व्हेरिएंटचे 21 नवीन रुग्ण; गोव्यात 19 केस; मे नंतर एका दिवसात सर्वाधिक 614 कोविड रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 मृत्यू
- “हा” फोटो पाहा, बॉडी लँग्वेज “वाचा” आणि INDI आघाडीचे “उज्ज्वल भवितव्य” ओळखा!!
- पाकिस्तानच्या शेअर बाजारात ३२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण!