• Download App
    "नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक जरी घासलं तरी..." सुशील मोदींचं वक्तव्य! Nitish Kumar will never be admitted to BJP Sushil Modi

    “नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक जरी घासलं तरी…” सुशील मोदींचं वक्तव्य!

    बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे,  असंही म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकारणातही उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रासारखे बिहारमध्ये राजकीय संकट आल्यास भारतीय जनता पक्ष (भाजप) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना कोणत्याही किंमतीत आपल्या गटात घेणार नाही, मग भलेही ते भाजपाच्या दरवाज्यावर नाक जरी रगडत असले तरी, असे भाजपा खासदार सुशील मोदी यांनी सोमवारी सांगितले. Nitish Kumar will never be admitted to BJP Sushil Modi

    एएनआयशी बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले, “अमित शाह यांनी आधीच स्पष्टपणे सांगितले आहे की ते नितीश कुमारांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाहीत,  मग भलेही नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक घासले तरीही. आम्ही १७ वर्षे नितीश कुमारांना सांभाळलं, मात्र आता भाजपा त्यांना स्वीकारणार नाही आणि भविष्यातही पुढे नेणार नाही.’’

    महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी म्हणाले की, “बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे कारण गेल्या 17 वर्षांत नितीश कुमार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी एक मिनिटही वेळ दिला नाही. त्यांना प्रतीक्षा करावी लागली. आता प्रत्येकाला अर्धा- एक तास वेळ दिला जात आहे..”

    Nitish Kumar will never be admitted to BJP Sushil Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Army Chief Warns : लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे; त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग राहायचे आहे की इतिहासाचा

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत यांनी झुरळांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले; म्हणाले- ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले

    Revanth Reddy : तेलंगणाचे CM म्हणाले- राहुल गांधी 2029 साठी PM पदाचा चेहरा; इंडिया ब्लॉकच्या मित्रपक्षांना तयार करू