Tuesday, 6 May 2025
  • Download App
    Nitish Kumar upstaged after obscene remarks; Apologize for shame!!

    बिहार विधानसभेतल्या “भीतर – बाहर” अश्लील वक्तव्यानंतर नितीश कुमारांना उपरती; लाज वाटून मागितली माफी!!

    वृत्तसंस्था

    पाटणा : “भीतर – बाहर” म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत सभ्यतेची मर्यादा पार केली. विधानसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अश्लील भाषा वापरली. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीकेची प्रचंड झोड उठली. या टीकेमुळे आपल्या राजकीय कारकीर्दीवर काळा डाग पडेल या भीतीपोटी नितीश कुमार यांनी लाज वाटून माफी मागितली.

    त्याचे झाले असे :

    जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहार विधानसभेत बोलताना नितीश कुमार यांनी सेक्स एज्युकेशन या विषयावर भाषण ठोकले. पण ते भाषण करतानाच “लडकी पढ लेगी तब पुरुष को भीतर मत घुसाने देगी, उसको बाहर ही करवाने देगी,” अशी अश्लील भाषा वापरली. नितीश कुमार यांच्या या भाषणाचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले आणि त्यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडले.

    लोकसंख्या कमी होत आहे. कारण मुली शिकत आहेत आणि त्या नवऱ्यांना जास्त काळ सेक्स करू देत नाहीत. आता बिहारमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण 2.9 टक्क्यांवर आहे, ते लवकरच 2 टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. मात्र ही माहिती सभ्य भाषेत त्यांनी दिली नाही, तर सेक्स एज्युकेशनचा क्लास भर विधानसभेत लावला, तो देखील अश्लील भाषेत!! नितीश कुमार यांचे भाषण चालू असताना त्यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य हसत होते. नितीश कुमार यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचे भान आमदारांना राहिले नव्हते.

    “लडका लडकी की जब शादी होती है, तो लडका रोज रात को करता है. अगर लडकी पढ लेगी, तो लडके को भीतर घुसाने नही देगी. वह तो करेगाही, लेकिन उसको बाहर करवाने देगी,” अशी भाषा नितीश कुमारांची यांनी वापरली. त्यावेळी विधानसभेच्या गॅलरीत बसलेल्या पत्रकारांना उद्देशून तुम्ही देखील हा मुद्दा समजून घ्या, असे त्यांच्याकडे पाहून सांगितले. Nitish Kumar upstaged after obscene remarks; Apologize for shame!!

    नितीश कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा पारा चढला. विशेषत: महिलांचा प्रचंड संताप झाला. लोकसंख्या वाढीसारख्या महत्त्वाच्या विषयावर नितीश कुमार यांच्यासारख्या 75 वर्षांचा मुख्यमंत्री अश्लील भाषा वापरतो, याचा महिलांनी निषेध केला. बिहारची मान संपूर्ण देशात त्यांनी खाली घातली. मुख्यमंत्र्यांच्या बेशरम भाषणाने महिलांनाही अपमानित वाटले, अशा कमेंट अनेक महिलांनी केल्या.

    थर्ड ग्रेड सिनेमाचा डायलॉग

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केंद्रीय मंत्री आर. पी. सिंह, नित्यानंद राय यांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली. नितीश कुमार यांचे विधानसभेतले वक्तव्य एखाद्या थर्ड ग्रेड सिनेमातल्या डायलॉग सारखे होते. त्यांना सेक्स एज्युकेशन द्यायचे होते तर त्यासाठी अन्य सभ्य मार्ग उपलब्ध होते, पण त्यांनी विधानसभेसारखे पवित्र मंदिर आपल्या अश्लील वक्तव्यातून काळवंडून टाकले. सर्वात वाईट भाग असा की ते जेव्हा बोलत होते, तेव्हा त्यांच्या भोवती बसलेले आमदार हसत होते. महिलांविषयी त्यांच्या मनात कशा अश्लील आणि घाणेरड्या भावना आहेत आहे हेच त्यातून दिसून आले, अशा तिखट शब्दांमध्ये रेखा शर्मा यांनी नितीश कुमार यांच्यावर शरसंधान साधले. केंद्रीय मंत्री आर. पी. सिंह आणि नित्यानंद राय यांनी देखील अशाच आशयाच्या भाषेत नितीश कुमार यांना झोडपले.

    लाज वाटून माफी

    विधानसभेतल्या भाषणाचा मुद्दा बिहारमध्ये फार तापला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या अखेरच्या कारकिर्दीत आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीवर काळा डाग पडेल. आपण कायमचे बदनाम होऊ या भीतीपोटी नितीश कुमार यांनी लाज वाटून माफी मागितली. मी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या. याबद्दल माझी मलाच लाज वाटते. मी माझीच निंदा करतो आणि हात जोडून माफी मागतो, असे नितीश कुमार म्हणाले.

    Nitish Kumar upstaged after obscene remarks; Apologize for shame!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manipur : मणिपूरमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल; उग्रवादी संघटनांच्या ११ सदस्यांना अटक

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

    Gujarat : गुजरातमध्ये पावसाने केला कहर, १४ जणांचा मृत्यू १६ जण जखमी

    Icon News Hub