विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नितीश कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा, पलटूराम, कितने आयाराम कितने गयाराम!!, अशा शब्दांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना शिव्यांची लाखोली वाहिली. Nitish Kumar the Color Changing Lizard; Congress
नितीश कुमार यांनी बिहारचे सरकार पाडून INDI आघाडी मधून बाहेर पडत भाजप बरोबर घरोबा केला. ते सायंकाळी नव्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
नितीश कुमार मोठे अनुभवी नेते आहेत. ते राजीनामा देतील आणि सरकार पडतील असे लालूप्रसाद यादव यांनी आम्हाला आधीच सांगितले होते असे किती आयाराम आले आणि गेले पण काँग्रेसला त्याचा फरक पडणार नाही असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
नितीश कुमार अनुभवी नेते असले तरी ते वारंवार राजकीय रंग बदलतात रंग बदलणाऱ्या सरड्याला ते जोरदार टक्कर देऊ शकतील असा टोमणा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी हाणला.
सत्तेच्या बळावर वेगवेगळ्या राज्यांमधली विरोधकांची घरे फोडणे त्यांची सरकारी पाडणे असले उद्योग भाजप करत आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. आगामी निवडणुकीत जनता भाजपला या फोडाफोडीचे चोख उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
Nitish Kumar the Color Changing Lizard; Congress
महत्वाच्या बातम्या
- Land for Job Scam : जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘ED’चे राबडी देवींना समन्स
- कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना सूचलं शहाणपण आणि..
- मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या विमानामध्ये गोंधळ, प्रवासी म्हणाला माझ्या सीटखाली बॉम्ब, मग…
- कर्नाटकातील कलबुर्गीत आंबेडकरांचा फोटो हाती घ्यायला लावून विद्यार्थ्याची काढली नग्न परेड