• Download App
    नितीश कुमार पेगाससच्या मुद्द्यावर म्हणाले : संसदेत चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे ! । Nitish Kumar Says Pegasus Issue Should Be Discussed In Parliament Truth Must Revealed

    नितीश कुमार पेगाससच्या मुद्द्यावर म्हणाले : संसदेत चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे !

     Pegasus Issue:  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पेगासस वादासंदर्भात संसदेत विरोधी पक्षांच्या चर्चेच्या आणि चौकशीच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, फोन टॅपिंगची मुद्दा इतक्या दिवसांपासून चर्चेत आहे, त्यावर चर्चा झालीच पाहिजे. अशा विषयांवरील प्रत्येक गोष्टी पाहिल्यानंतर, योग्य पावले उचलली पाहिजेत. Nitish Kumar Says Pegasus Issue Should Be Discussed In Parliament Truth Must Revealed


    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पेगासस वादासंदर्भात संसदेत विरोधी पक्षांच्या चर्चेच्या आणि चौकशीच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, फोन टॅपिंगची मुद्दा इतक्या दिवसांपासून चर्चेत आहे, त्यावर चर्चा झालीच पाहिजे. अशा विषयांवरील प्रत्येक गोष्टी पाहिल्यानंतर, योग्य पावले उचलली पाहिजेत.

    मुख्यमंत्री नितीश कुमार पुढे म्हणाले, ‘काय झाले, काय झाले नाही, काही लोक संसदेत बोलत आहेत आणि आम्ही फक्त वर्तमानपत्रात काय येते ते पाहतो. पण जे काही प्रकरण आहे, त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काहीही असले तरी ते सर्वांसमोर आले पाहिजे.”

    नितीश यांनी दबावाखाली विधान बदलू नये : मनोज झा

    त्याचवेळी राजदचे खासदार मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्या वक्तव्याबद्दल सांगितले की, मी त्यांना (नितीशकुमार) त्यांच्या मागणीला चिकटून राहण्याची विनंती करेन. झा पुढे म्हणाले की, मला आशा आहे की नितीशकुमार कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत आणि उद्या असे म्हणणार नाहीत की, माझ्या विधानाचा विपर्यास झाला.”

    Nitish Kumar Says Pegasus Issue Should Be Discussed In Parliament Truth Must Revealed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार