विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी वादग्रस्त विषयावर “गप्प” राहतील, असे आश्वासन काँग्रेस कडून मिळवून विरोधकांची एकजूट करायला निघालेल्या नितीश कुमार यांनी विरोधकांसाठी पंतप्रधान पदाची स्पर्धा खुली केली आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्याला पंतप्रधान बनायचे नाही. पण आधी एकजूट करू आणि मग नेता निवडू, अशा शब्दांमध्ये नीतीश कुमार यांनी पंतप्रधान पदाची स्पर्धा खुली केली आहे. Nitish Kumar says he is not willing to become prime minister, but open battle lines in the opposition
नितीश कुमार यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यामध्ये जाऊन, तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लखनऊ मध्ये जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांशी त्यांनी विरोधी एकजुटीवर चर्चा केली. अखिलेश यादव यांची भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, मी स्वतः पंतप्रधान बनण्यासाठी विरोधकांची एकजूट करत नसून आधी विरोधकांची एकजूट करू आणि मग नेता निवडू. केंद्रातल्या भाजप सरकारला हटविणे हेच देशातल्या सर्व विरोधकांचे प्राधान्य आहे आणि त्यासाठी बंगाल मधून ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशातून अखिलेश यादव यांची साथ विरोधकांना मिळाली आहे. नितीश कुमार यांच्या या वक्तव्याला अखिलेश यादव यांनी देखील होकार भरला आहे.
नीतीश कुमार यांनी विरोधकांचे ऐक्य एका विशिष्ट गांभीर्याने सुरू केले आहे. पण ते सुरू करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून एक ठोस आश्वासन घेतले आहे ते म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकांमधल्या कुठल्याही वादग्रस्त मुद्द्यावर राहुल गांधी “गप्प” बसतील, हे ते आश्वासन आहे. राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांमध्ये सावरकर ते अदानी या मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने करून देशात मोठी खळबळ उडवली होती. पण सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी बॅकफूटवर ढकलले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला देशभर नाचक्की सहन करावी लागली होती.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमध्ये एका मुद्द्यावर एकमत झाले आहे, ते म्हणजे राहुल गांधींनी कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर शक्यतो “गप्प” राहावे आणि विरोधकांचे ऐक्य घडू द्यावे, यावर काँग्रेसचे नेतृत्व सहमत झाले आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार यांनी गांभीर्याने विरोधकांच्या एकजूटीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जी आणि त्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत नितीश कुमार यांनी आपल्याला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. आपण पंतप्रधान बनणार नाही आपण फक्त सर्व विरोधकांची एकजूट घडवत आहोत, असे स्पष्ट केले आहे. पण आधी एकजूट करू आणि मग नेता निवडू, असे वक्तव्य करून नितीश कुमार यांनी विरोधकांमधल्या अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी पंतप्रधान पदाची स्पर्धा खुली केली आहे.
Nitish Kumar says he is not willing to become prime minister, but open battle lines in the opposition
महत्वाच्या बातम्या
- सुदान मधील संघर्षादरम्यान भारताचे ‘ऑपरेशन कावेरी’; ५०० भारतीयांना सुरक्षितपणे बंदरापर्यंत आणले!
- विरोधकांच्या ऐक्यासाठी बैठका सुरू असताना भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून”मिशन साऊथ”!!
- ‘’ शरद पवारांना एखाद्यावेळेस कळलही असेल, ज्यांच्या परिवारातील ५० लोक निघून जातात, ते पुढे…’’ बावनकुळेंचं विधान!
- शरद पवार राष्ट्रीय नेते; ते महाविकास आघाडीच्या प्रादेशिक वज्रमूठ सभांना हजर राहणार नाहीत!!