Tuesday, 6 May 2025
  • Download App
    राहुल गांधी "गप्प" राहतील, या अटी काँग्रेस कडून मान्य करवून घेऊन नितीश कुमार ममता - अखिलेश यांच्या भेटीला!!Nitish Kumar meeting with Mamata banerjee and Akhilesh Yadav for opposition unity is serious affair on certain conditions on Congress

    राहुल गांधी “गप्प” राहतील, या अटी काँग्रेस कडून मान्य करवून घेऊन नितीश कुमार ममता – अखिलेश यांच्या भेटीला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात भाजप विरोधात खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांचे ऐक्य व्हायचे असेल, तर राहुल गांधी काही विशिष्ट मुद्द्यांवर “गप्प” राहतील, या अटी शर्ती काँग्रेस कडून मान्य करवून घेऊनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्या भेटीला गेले आहेत. Nitish Kumar meeting with Mamata banerjee and Akhilesh Yadav for opposition unity is serious affair on certain conditions on Congress

    प्रसार माध्यमांनी ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीची बातमी दिली आहे. मात्र तेवढी ती वरवरची नाही. त्यापलिकडे जाऊन नितीश कुमार काँग्रेसच्या सांगण्यावरून खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हे प्रयत्न करण्याआधी नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून एक ठोस आश्वासन मिळवले आहे, ते म्हणजे राहुल गांधी देशभरातल्या काही वादग्रस्त मुद्द्यांवर काही काळ तरी “गप्प” राहतील. विशेषतः विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या आड येऊ शकतील असे कोणतेही वादग्रस्त मुद्दे राहुल गांधी काढणार नाहीत, या त्या अटी शर्ती आहेत. त्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केल्यानंतरच नीतीश कुमार काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल ठरेल असे विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी महत्त्वाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची भेट यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे.

    देशात मोदी विरोधात विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी नितीश कुमार करत असलेले प्रयत्न हा आतापर्यंतचा सर्वात गंभीर प्रयत्न आहे आणि त्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी “गप्प” करण्याची विशिष्ट लवचिकताही दाखवली आहे, की जी आत्तापर्यंत काँग्रेस दाखवायला तयार नव्हती.

    नितीश कुमार यांनी काँग्रेस नेतृत्वाला राहुल गांधी “गप्प” राहण्याच्या मुद्द्यावर “कन्व्हिन्स” केल्यानंतर त्यांनी काँग्रेस कडून मध्यस्थी करायला मान्यता देऊन ते ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची “समजूत” घालण्यासाठी त्यांना भेटले आहेत.

    ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचे काँग्रेस नेतृत्वाविषयी विशेषतः राहुल गांधींविषयी आक्षेप समान आहेत. राहुल गांधींनी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये ममता आणि अखिलेश या दोघांनाही पूर्ण फ्री हँड देऊन केंद्रात त्या बदल्यात त्यांचा पाठिंबा मागावा. किंबहुना प्रादेशिक पक्षांचा वाढलेला राजकीय टक्का काँग्रेसने मनापासून मान्य करावा, या दोन अटी ममता आणि अखिलेश यांनी घातल्या आहेत. ज्या काँग्रेससाठी मान्य करणे अवघड असले तरी सध्या ती राजकीय अपरिहार्यता आहे, असे समजून काँग्रेसने त्या मान्य केल्या आहेत आणि त्यामुळेच विरोधी ऐक्याची खडकाळ प्रांतामध्ये अडकलेले गाडी पुढे सरकते आहे.

    अर्थात नितीश कुमारांची ही सुरुवात आहे. त्यांनी प्रत्यक्ष जाहीर न करता यूपीए मधल्या समन्वयाची किंबहुना युपीए परिघाबाहेरच्या समन्वयाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्यामध्ये त्यांना बिहारचेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही साथ मिळताना दिसत आहे. काँग्रेस – नितीश – ममता – अखिलेश यांच्या डील मध्ये तेजस्वी यादव यांचा देखील फायदा होण्याचे दाट शक्यता आहे. कारण नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे एकत्रित राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या खेरीज दुसरे कुठले नेतृत्व बिहारमध्ये उभे राहताना दिसत नाही. तेजस्वी यादव त्याचा फायदा घेत आहेत.

    Nitish Kumar meeting with Mamata banerjee and Akhilesh Yadav for opposition unity is serious affair on certain conditions on Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Manipur : मणिपूरमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल; उग्रवादी संघटनांच्या ११ सदस्यांना अटक

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

    Gujarat : गुजरातमध्ये पावसाने केला कहर, १४ जणांचा मृत्यू १६ जण जखमी