• Download App
    Nitin Nabin Nitin Nabin यांना भाजपने कसे निवडले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष??; काय घडली inside story??; पुढे काय होईल??

    Nitin Nabin यांना भाजपने कसे निवडले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष??; काय घडली inside story??; पुढे काय होईल??

    भाकरी फिरवली, राजकीय भूकंप केला, अशी कुठलीही “पवार बुद्धीची” किंवा “काँग्रेसी बुद्धीची” भाषा न वापरता आणि माध्यमांना कुठलीही भनक लागू न देता भाजपने नितीन नवीन सिन्हा यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष निवडले. संपूर्ण देशातल्या राजकीय वर्तुळाला मोठा आश्चर्याचा धक्का दिला. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ते आपापल्या कामाला लागले. याच दरम्यान भाजपच्या सगळ्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्य प्रवाहातल्या प्रसार माध्यमांना पुरते “कामाला” लावले होते.

    पण भाजपने नितीन नवीन सिन्हा यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याला बिहार मधून एकदम उचलून राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आणून ठेवले तरी कसे??, याची थोडी inside story काढली, तर काही वेगळेच राजकीय सत्य समोर आले. हे सत्य भाजपच्या अति वरिष्ठ आणि संघाच्या अति वरिष्ठ वर्तुळाच्या पलीकडे कुठे पोहोचू शकले नव्हते. केवळ मोदी – शाह यांच्या मनात आले आणि त्यांनी नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नेमले, असे बिलकुल घडलेले नाही.

    – 45 ते 55 हा वयोगट

    भाजप आणि संघाच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून संपूर्ण संघ परिवारातल्या (फक्त भाजप मधल्या नव्हे) 45 ते 55 अशा वयोगटातल्या 20 निवडक नेत्यांची सर्व बाजूंनी माहिती मिळवून त्या माहितीची व्यवस्थित scrutiny करून मगच महत्त्वपूर्ण अंतिम निर्णय घेतला. त्यातूनच नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक केली.

    या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयापासून ते गृहमंत्रालयापर्यंत आणि गृहमंत्रालयापासून भाजप आणि संघाच्या वरिष्ठ वर्तुळापर्यंतच्या सर्व अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय घटकांचा समावेश होता.



    – नेमके निकष काय??

    या 20 निवडक नेत्यांची आणि त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अध्यात्मिक सर्व बाजूंची तपासणी केली गेली. देशातल्या किंवा राज्यातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, संकट काळात संबंधित 20 निवडक नेते कसे वागतात?? त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात??, ते आव्हानांवर कशा पद्धतीने मात करू शकतात??, त्यांची बलस्थाने कोणती??, त्यांच्या उणिवा कोणत्या??, त्यांच्या क्षमतांची परमावधी कुठपर्यंत पोहोचू शकते??, त्यांच्या क्षमता कुठल्या परिस्थितीत घसरू शकतात किंवा सावरू शकतात??, या सगळ्या बाबींची तपासणी गेले साधारण वर्षभर सुरू होती.

    – प्रत्येकाला महत्त्वाचे काम

    यातल्या 20 पैकी 20 जणांना भाजपने अनेक कामांसाठी तयार करायचा निर्णय घेतला. त्यापैकी एक निर्णय नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमून पूर्ण केला. आता उरलेल्या 19 जणांना राष्ट्रीय पातळीपासून राज्य पातळीपर्यंत कुठल्या ना कुठल्या महत्त्वाच्या आणि कळीच्या पदांवर नियुक्त केले जाईल, नेमले जाईल, निवडले जाईल, पाठविले जाईल. त्यांना महत्त्वाचेच काम दिले जाईल. जेणेकरून भाजपमध्ये सर्वांत महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत नव्या पिढीला महत्त्वाचे स्थान देऊन सामावून घेतले जाईल. ही प्रक्रिया कुठल्या राजकीय भूकंपासाठी किंवा राजकीय क्रांती सारखी नव्हे, तर राजकीय उत्क्रांती सारखी घडविली जाईल.

    – भाजपमधून भूकंपाची बातमी नाही मिळणार

    मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कितीही डोकी आपटली किंवा अन्य कुठलेही अवयव कुठेही आपटले, तरी किमान सध्याच्या राजकीय परिस्थितीत तरी त्यांना भाजपमधून कुठल्या राजकीय भूकंपाची बातमी मिळणार नाही. त्यांना भाजप मधल्या क्रांतीची बातमी कळणार नाही. त्यांना भाजप मधली राजकीय उत्क्रांतीच लांबून पाहावी लागेल. कारण संघ परिवाराने भाजपला पुढच्या 25 ते 30 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीसाठी तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. Generational change चे पुढचे पाऊल टाकले आहे.

    Nitin Nabin selection inside story

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CBI Charge : सीबीआयने 4 चिनी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले; 100 हून अधिक बनावट कंपन्या तयार केल्या

    Lionel Messi : मेस्सीच्या टूर आयोजकाला 4 दिवसांची कोठडी; चौकशी पथक व राज्यपाल स्टेडियमवर, संतप्त चाहत्यांनी तोडफोड केली होती

    Nitin Nabin : काँग्रेसी चष्म्यातून भाजपचे विश्लेषण; मुख्य प्रवाहातील माध्यमे पडली तोंडावर!!, कारण…..