• Download App
    नेहरूंचे नाव घेत नितीन गडकरींनी विरोधकांना दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला; म्हणाले, आम्हीही वाजपेयींकडून घेतला लोकशाहीचा आदर्श|Nitin Gadkari praise Pt. Jawaharlal Nehru and Atal Bihari Vajpeyee as great democratic leaders

    नेहरूंचे नाव घेत नितीन गडकरींनी विरोधकांना दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला; म्हणाले, आम्हीही वाजपेयींकडून घेतला लोकशाहीचा आदर्श

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान कै. पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव घेऊन विरोधी पक्षांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला तसेच भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून लोकशाहीचा आदर्श घेतल्याचेही स्पष्ट केले. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.Nitin Gadkari praise Pt. Jawaharlal Nehru and Atal Bihari Vajpeyee as great democratic leaders

    नितीन गडकरी म्हणाले, की माजी पंतप्रधान कै. जवाहरलाल नेहरू आणि कै. अटल बिहारी वाजपेयी हे लोकशाहीचे आदर्श नेते होते. दोन्ही नेत्यांनी लोकशाही मर्यादांचे पालन करण्याची भूमिका मांडली. अटलजींचा राजकीय वारसा हीच आमची प्रेरणा आहे, तर पंडित जवाहर लाल नेहरू यांनी भारताच्या लोकशाही रूजविण्यात महत्त्वाचे योगदान आहे, अशा भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या.



    नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील भाष्य केले. कृषी कायदे, इंधन दरवाढ, पेगासस हेरगिरी या मुद्यांवरून विरोधकांनी संसदेचे अधिवेश चालू दिले नाही.

    सगळे दिवस गदारोळ करून कामकाज बंद पाडले. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील बहुतांश वेळ वाया गेला. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही. नियोजित वेळेअगोदरच अधिवेशन संपवावे लागले, याबद्दल नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

    त्याचवेळी त्यांनी पंडित नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांची उदाहरणे देऊन विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, की सत्ताधारी आणि विरोधक बदलत राहतात. हा लोकशाहीचा आत्मा आहे. हे आजच्या विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. लोकशाहीच्या मर्यादांचे पालन करून देश पुढे न्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

    Nitin Gadkari praise Pt. Jawaharlal Nehru and Atal Bihari Vajpeyee as great democratic leaders

    महत्वाच्या बातम्या

     

     

     

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य