विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे इंटर्नशिपचा कालावाधी पूर्ण होऊ शकला नसल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पीजी परीक्षा पुढे ढकललीआहे. 12 मार्च रोजी होणारी परीक्षा 6-8 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. आता लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.Nit PG exam postponed,The decision of the Union Ministry of Health
सर्वोच्च न्यायालयात सहा एमबीबीएस विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली, ज्यामध्ये 12 मार्च रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा 2022 काही आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका एमबीबीएसच्या उमेदवारांनी दाखल केली होती. समुपदेशनात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना सामावून घेता यावे यासाठी तारखा राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पुढे ढकलल्या पाहिजेत. इंटर्नशिपसाठी बोडार्ने नमूद केलेल्या अटींनाही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.
कोविड-19 महामारीमुळे आपले इंटर्नशिप पूर्ण करू न शकलेले शेकडो एमबीबीएस उमेदवार नीट पीजीच्या परीक्षेला बसू शकणार नाहीत. अशा स्थितीत इंटर्नशिपची मुदत वाढवण्याची मागणी उमेदवारांनी केली होती, जेणेकरून त्यांना इंटर्नशिप पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि ते परीक्षा देऊ शकतील.
Nit PG exam postponed,The decision of the Union Ministry of Health
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला अटक
- पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा
- आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण
- सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती
- वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!