• Download App
    टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये आणखी दोन पदकांचा धमाका; निशाद कुमारला उंच उडीत रौप्य पदक तर, विनोद कुमारला थाळी फेकीत ब्राँझ पदक Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record

    टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये आणखी दोन पदकांचा धमाका; निशाद कुमारला उंच उडीत रौप्य पदक तर, विनोद कुमारला थाळी फेकीत ब्राँझ पदक

    वृत्तसंस्था

    टोकियो – टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये भारताच्या भाविका पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक मिळविल्या पाठोपाठ भारतीय खेळाडूंनी आणखी पदकांचा धमाका केला असून निशाद कुमारने टी ४६ उंच उडीत रौप्य पदक मिळविले आहे, तर विनोद कुमार याने थाळी फेकीत ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले आहे. Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record

    निशाद कुमारने रौप्य पदक पटकावताना आशियायी विक्रम तोडला आहे. निशाद कुमारने २.०६ मीटर उंच उडी मारली. अमेरिकेच्या रॉड्रीक टाऊनसेंड याने २.१५ मीटर उंच उडी मारून सुवर्ण पदक पटकावले. डल्लास वाईज यानेही २.६ मीटर उडी मारली होती. परंतु, पहिल्या फेरीत त्याने २.०० मीटर उंच उडी मारली होती, तर निशाद कुमार याने २.०२ मीटर उंच उडी मारली होती. त्यामुळे निशादला रौप्य पदक देण्यात आले. डल्लास वाईजनेही दुसरेच स्थान पटकावले. भारताच्या रामपाल छाचर याने १.९४ मीटर उंच उडी मारली. त्याने पाचवे स्थान पटकावले.

    विनोद कुमार याने थाळीफेकीत ब्राँझ पदक पटकावले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांनी पदके पटकावणाऱ्या खेळांडूंचे अभिनंदन केले आहे.

    Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश यांची घोषणा- बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत; 1 ऑगस्ट 2025 पासून लाभ

    Delhi AAP :दिल्लीत AAP वर आणखी एका घोटाळ्याचा आरोप; प्रतिभा विकास योजनेत 145 कोटींचा घोटाळा; एलजींनी दिले चौकशीचे आदेश

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके