• Download App
    इन्कम टॅक्सच्या छाप्यांमुळे अखिलेश यादव का घाबरलेत?, त्यांचा पैसा तिथे अडकलाय का??; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पलटवार |Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    इन्कम टॅक्सच्या छाप्यांमुळे अखिलेश यादव का घाबरलेत?, त्यांचा पैसा तिथे अडकलाय का??; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पलटवार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अत्तराचे व्यापारी पियुष जैन आणि पुष्पराज जैन यांच्यावर प्राप्तिकर विभागाने घातलेले छापे योग्यच आहेत. जीएसटी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले आहेत.Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    पण या छाप्यांमुळे अखिलेश यादव का घाबरले आहेत?, त्यांचा तिथे सापडलेल्या पैशाची काही संबंध आहे का? असे खोचक सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहेत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

    उत्तर प्रदेशात चुकीच्या ठिकाणी छापे घातल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला होता. यासंदर्भात एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला असता निर्मला सीतारामन यांनी त्या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिले. त्याच वेळी त्यांनी अखिलेश यादव का घाबरले आहेत?, असा खोचक सवालही केला.



    निर्मला सीतारामन म्हणाल्या, की जीएसटी डिपार्टमेंटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापे घालण्यास आले आहेत. यातला पहिला छापा तर अहमदाबाद मध्ये पकडलेल्या ट्रक ड्रायव्हरने दिलेल्या माहितीच्या आधारे तसेच त्याच्या जवळील कागदपत्रे आणि जीएसटी विभागाकडे असलेली गुप्त माहिती यांच्या आधारे घालण्यात आला होता.

    त्यामध्ये संबंधित व्यापाऱ्याकडे (पियुष जैन) सापडलेली संपत्ती पाहता या योग्य ठिकाणीच ठिकाणी छापा घातल्याचे लक्षात येईल. प्राप्तिकर खात्याने छापा घातला आणि ते रिकाम्या हाताने परत आले असे घडलेले नाही. ते जर रिकाम्या हाताने परत आले असते तर चुकीच्या ठिकाणी छापा घातला असा आरोप करणे कदाचित मान्य झाले असते.

    परंतु त्या व्यापाऱ्याकडे जी प्रचंड कॅश सापडली आणि 23 किलो सोन्याच्या चीपा सापडल्या त्या काय सर्वसामान्यांच्या घरात सापडत असतात का? इतके सोने सर्वसामान्यांच्या घरात असते का? तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे तर एवढे सोने नाही, असा खोचक टोला निर्मला सीतारामन यांनी लगावला. त्याच वेळी त्यांनी प्राप्तिकराच्या छाप्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले असले तरी तरी ते खोटे ठरले, असे सांगितले.

    निर्मला सीतारामन म्हणाल्या की, उलट मी अखिलेश यादव यांनाच विचारु इच्छिते की इन्कम टॅक्सच्या छाप्यांमुळे तुम्ही एवढे का घाबरलात? त्या व्यापाऱ्याकडे सापडलेल्या मालमत्तेची तुमचा काही संबंध आहे का? त्याने कर चोरी केली असेल किंवा काहीही केले असेल त्याच्याशी तुमचा संबंध आहे का?

    तुम्ही कोणाचे समर्थन करत आहात?, याची जाणीव तुम्हाला आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती सापडली त्या संपत्तीची तुमचा काही संबंध असल्याने तुम्ही घाबरलात का? असे एकापाठोपाठ एक सवाल निर्मला सीतारमण यांनी अखिलेश यादव यांना केले आहेत.

    त्याचबरोबर आज समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार पुष्पराज जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे घातले तेही जीएसटी डिपार्टमेंटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घालण्यात आले आहेत आणि तेथेही गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती बाहेर येते आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

    केंद्रीय तपास संस्थांमार्फत कोणत्याही राज्यांमध्ये कारवाई झाली की केंद्र सरकार विरुद्ध आरडाओरडा करण्याची प्रथा बनली आहे. परंतु क्वचित प्रसंगीच केंद्रीय नेते या आरोपांना उत्तर देताना दिसतात. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रथमच सविस्तर उत्तर देऊन प्रादेशिक पक्षाच्या नेत्यालाच प्रतिआव्हान दिल्याचे इन्कम टॅक्सच्या छाप्यांच्या निमित्ताने दिसून आले आहे.

    Nirmala Sitaraman gives befitting replay to Akhilesh Yadav

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!