• Download App
    पीएफआय वर एनआयएचे चार्जशीट; किलर स्वाड बनवून 24 वर्षांत भारताच्या इस्लामीकरणाचे कारस्थान NIA's charge sheet on PFI; Conspiracy to Islamize India in 24 Years by Making Killer Savad

    पीएफआय वर एनआयएचे चार्जशीट; किलर स्वाड बनवून 24 वर्षांत भारताच्या इस्लामीकरणाचे कारस्थान

    वृत्तसंस्था

    बेंगलोर : कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू हत्याकांडात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (पीएफआय) हात होता. या संघटनेने आगामी 24 वर्षांत म्हणजे 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट रचल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने ‘एनआयए’ आपल्या आरोपपत्रात केला आहे. प्रवीण नेत्तारूची 26 जुलै 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएने 20 आरोपींना अटक केली आहे. NIA’s charge sheet on PFI; Conspiracy to Islamize India in 24 Years by Making Killer Savad

    इतकेच नाही तर पीएफआयची किलर स्वाड बनवून भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी किलर स्वाड बनवून भारताच्या इस्लामीकरणाचे कारस्थान रचल्याचेही तपशीलवार खुलासे एनआयएने आरोपांमध्ये केले आहेत.

    केरळ पोलीसांचे तब्बल 873 अधिकारी, कर्मचारी PFI चे हस्तक; NIA चा धक्कादायक खुलासा!

    भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची दक्षिण कन्नड येथील बेल्लारे इथे त्यांच्याच दुकानासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. काही दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी प्रवीण नेत्तारू यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रवीण नेत्तारू खून प्रकरणाचा तपास एनआयए करत असून, आतापर्यंत या हत्याकांडात अनेक खळबळजनक खुलासे समोर झाले आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरणामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हात होता. या प्रकरणातील फरार आरोपींवर तपास यंत्रणेने बक्षीसही जाहीर केले आहे. पीएफआय पुढील 24 वर्षे म्हणजे 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट रचत असल्याचे तपासात समोर आले आहे.

    ‘या’ नावाने गुप्त पथके स्थापन

    एनआयएने आरोपपत्रात सांगितले की, पीएफआय दहशत पसरवणे, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याच्या अजेंडाचा एक भाग म्हणून, भारताला 2047 पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचा कट रचत आहे. त्यांनी किलर स्क्वॉड नावाच्या गुप्त पथकांची स्थापना केली आहे. नुकतेच एनआयएने प्रवीण नेत्तारू खून प्रकरणातील दोन आरोपींवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दोन आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ (53) आणि मसूद (40) यांचा समावेश आहे. हे दोघेही प्रतिबंधीत पीएफआय या संघटनेचे सदस्य आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये एनआयएने 4 संशयितांना अटक केली होती.

    NIA’s charge sheet on PFI; Conspiracy to Islamize India in 24 Years by Making Killer Savad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला