• Download App
    टेरर फंडिंग प्रकरणी ‘NIA’कडून काश्मिरी व्यापारी वतालीच्या १७ मालमत्ता जप्त NIA seizes 17 assets of Kashmiri businessman Watali in terror funding case

    टेरर फंडिंग प्रकरणी ‘NIA’कडून काश्मिरी व्यापारी वतालीच्या १७ मालमत्ता जप्त

    (संग्रहित)

    लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) कमांडर यासीन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    काश्मीर : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने टेरर फंडिंग प्रकरणात काश्मिरी व्यापारी जहूर अहमद शाह वतालीच्या 17 मालमत्ता जप्त केल्या आहेत. याच प्रकरणी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) कमांडर यासीन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. NIA seizes 17 assets of Kashmiri businessman Watali in terror funding case

    यासीन मलिक व्यतिरिक्त जमात-उद-दावाचा अमीर आणि लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर हाफिज मुहम्मद सईद आणि हिजबुल-मुजाहिदीनचा टॉप कमांडर सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह 17 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. NIA ने 30 मे 2017 रोजी या प्रकरणी स्वतःहून दखल घेतली होती. त्याचबरोबर मलिकला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या सर्व खटल्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    हे प्रकरण जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबा, जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या आयएसआय समर्थित संघटनांच्या दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित आहे. या संघटना नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करून खोऱ्यात दहशत आणि हिंसाचार भडकावत होत्या.

    एनआयएने काश्मीरमधील हंदवाडा, कुपवाडा येथील वतालीच्या 17 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यूएपीए कायद्याच्या कलम ३३(१) अंतर्गत विशेष एनआयए न्यायालयाच्या आदेशानुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

    NIA seizes 17 assets of Kashmiri businessman Watali in terror funding case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित