• Download App
    भारतात गुन्हे करून कॅनडामध्ये आश्रय घेणाऱ्या 11 अतिरेक्यांची यादी NIA ने केली जाहीर|NIA released the list of 11 terrorists who committed crimes in India and took shelter in Canada

    भारतात गुन्हे करून कॅनडामध्ये आश्रय घेणाऱ्या 11 अतिरेक्यांची यादी NIA ने केली जाहीर

    वृत्तसंसथा

    नवी दिल्ली : कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 11 गुंड-दहशतवाद्यांची यादी फोटोंसह जारी केली आहे. ते सर्व भारतात गुन्हे करून कॅनडामध्ये आश्रय घेत आहेत.NIA released the list of 11 terrorists who committed crimes in India and took shelter in Canada

    या यादीत पहिले नाव आहे गँगस्टर गोल्डी ब्रारचे. त्याने पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली. यानंतर तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



    याशिवाय एनआयएने अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श डल्ला, दरमन सिंग काहलॉन, लखबीर सिंग, दिनेश शर्मा उर्फ ​​गांधी, नीरज उर्फ ​​पंडित, गुरपिंदर, सुखदुल, गौरव पटियाल उर्फ ​​सौरभ गँगस्टर दलेर सिंग यांचे फोटो जारी केले आहेत.

    एनआयएचे म्हणणे आहे की, भारतात खून आणि खंडणी व्यतिरिक्त, त्यांच्यावर पाकिस्तानच्या चिथावणीवरून देशविरोधी गुन्हे केल्याचा आरोप आहे. त्यापैकी बहुतांश कॅनडामध्ये लपलेले आहेत.

    कॅनडात चैनीचे जीवन जगत आहेत गुंड

    एनआयएने ज्या 11 गुंडांचे फोटो जारी केले आहेत, त्यापैकी पंजाबमध्ये गुन्हे करून पळून गेलेले 7 गुन्हेगार अ श्रेणीतील आहेत. हे सर्व गुन्हेगार कॅनडात चैनीचे जीवन जगत आहेत. आता हे सर्वजण खलिस्तानी लोकांसह तरुणांना फसवून गुन्हेगारीच्या जगात ढकलत आहेत.

    शीख फॉर जस्टीस, खलिस्तान टायगर फोर्स, वर्ल्ड शीख संघटना, बब्बर खालसा इंटरनॅशनल या कॅनडाच्या भूमीतील 9 फुटीरतावादी संघटना भारतविरोधी काम करत आहेत. या सर्व फुटीरतावादी संघटनांचा दहशतवाद आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांशी थेट संबंध आहे. या फुटीरतावादी संघटनांचे प्रमुख कुख्यात दहशतवादी आहेत, असेही म्हणता येईल.

    NIA released the list of 11 terrorists who committed crimes in India and took shelter in Canada

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे