• Download App
    इस्लामी ISIS कनेक्शन : NIA ची देशभरात 6 राज्यांमध्ये धडक कारवाई; कोल्हापूर, नांदेडमध्येही छापे!! NIA raids in 6 states across the country

    इस्लामी ISIS कनेक्शन : NIA ची देशभरात 6 राज्यांमध्ये धडक कारवाई; कोल्हापूर, नांदेडमध्येही छापे!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ISIS या इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंधित विविध घातपाती कारवायासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्था NIA ने देशभरात एकूण ६ ठिकाणी छापे घातले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड या भागात सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी रेंदाळमध्ये NIA चा छापा घातल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.  NIA raids in 6 states across the country

    इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या घातपाती कारवाया देशभर वाढल्या. पीएफआय कनेक्शनशी संबंधित बँक खाती ईडी, सीबीआयने गोठवली. त्यातील व्यवहार तपासले असता दरमहा या खात्यांमध्ये तब्बल 500 कोटी रुपये जमा होत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    – अनेक शहरांमध्ये छापे

    एनआयएच्या अधिकाऱ्यांनी देशात 6 राज्यांतील अनेक शहरांमध्ये छापे घातले आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील भोपाळ, रायसेन, गुजरातमधील भडोच, सुरत, नवसारी, अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकल आणि तुमकुर, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड आणि उत्तर प्रदेशातील देवबंद यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये काही कागदपत्र आणि साहित्य हाती लागले आहे.

    NIA raids in 6 states across the country

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली