• Download App
    NIA raids at 41 places in Thane, Pune

    ठाणे, पुण्यात 41 ठिकाणांवर NIA चे छापे; ISIS चे जिहादी जाळे उद्ध्वस्त!!; साकीब नाचनसह 14 जणांना अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, नियोजित असलेल्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर देशात घातपाती कारवाया करून हलकल्लोळ माजविण्याचे कारस्थान रचणाऱ्या ISIS चे जिहादी जाळे राष्ट्रीय तपास संस्था NIA ने आज उद्ध्वस्त केले. NIA च्या अधिकाऱ्यांनी आज ठाणे पुणे या शहरांमध्ये तब्बल 41 ठिकाणी एकाच वेळी छापे घातले आणि साकिब नाचन याच्यासह 14 जणांना अटक केली. ठाण्यातल्या पडघा गाव, मीरा भाईंदर मध्ये ही धडक कारवाई आज पहाटेपासून सुरू आहे. NIA एकूण 44 ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये पुण्यातले 1 ठिकाण आणि कर्नाटकातले 1 ठिकाण यांचा समावेश आहे.  NIA raids at 41 places in Thane, Pune

    मोटार सायकल चोरीचा तपास करताना पोलिसांच्या हाती काही वेगळे धागेदोरे लागले आणि त्यातून संपूर्ण देशातल्या घातपाती कारवाया करण्याच्या ISIS या आंतरराष्ट्रीय जिहादी दहशतवादी संघटनेच्या कारस्थानचा उलगडा झाला. त्या पाठोपाठNIA आज धडक कारवाई करून एकाच वेळी 41 ठिकाणांवर छापे घातले. यात साकिब नाचनसह 14 जणांना अटक केली.

    इसिसचे नेटवर्क उद्ध्वस्त

    राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर यासह कर्नाटकात कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघात कारवाई सुरु आहे. एकूण ठाणे ग्रामीणमधील ३९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. पुणे शहरात दोन ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. भिवंडीच्या पडघ्यामुळे काही दिवसांपूर्वी एनआयने कारवाई केली होती.

    एनएनएनला मोठे यश

    एनआयएने छापेमारी दरम्यान अतिरेक्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिसचे हँडलर्स या सर्वांचा पर्दाफाश केला आहे. देशभरात दहशवादी कारवाया करण्याचा कट उद्ध्वस्त केला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते. या नेटवर्कमधील सहभागी अतिरेक्यांनी आयईडी तयार केले होते. पुणे शहरातील कोंढव्यामधील एका घरात आयईडी असेंबल केले होते. तसेच या दशतवाद्यांनी साताऱ्याच्या जंगलात त्याची चाचणी केली होती.  या प्रकरणात मोहम्मद शहनवाज ऊर्फ शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि तालाह लियाकत खान यांना अटक केल्यानंतर एनआयएला धक्कादायक माहिती मिळाली होती.

    NIA raids at 41 places in Thane, Pune

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार