वृत्तसंस्था
नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) बुधवारी सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील 51 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. लॉरेन्स, बांबिहा आणि अर्श डल्ला टोळीच्या साथीदारांच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.NIA crackdown on Khalistani-gangster network; Raids at 51 locations in 6 states including UP-Punjab and Rajasthan
या कारवाईचा संबंध खलिस्तानी दहशतवाद्यांशी जोडला जात आहे. पंजाबमध्ये सुमारे 30 आणि हरियाणात 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने यूपीच्या पिलीभीत, लखीमपूर खेरी, अलीगढ, सहारनपूर येथे छापे टाकले आहेत.
दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू असताना एनआयएची ही कारवाई झाली आहे. पंजाबमधील भटिंडा येथे गॅंगस्टर हॅरी आणि गुरप्रीत यांच्या घराची झडती सुरू आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पंजाबमध्ये 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. भटिंडा येथे बुधवारी सकाळी 6 वाजता एनआयएच्या दोन पथके रामपुरा आणि मोड मंडी येथे पोहोचली. हे पथक जेठुके गावात गुरप्रीत सिंग ऊर्फ गुरीच्या घराची झडती घेत आहेत. गुरी हा भटिंडा पोलिसांना खुनासह अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी आहे. हॅरी मोरच्या घरी एक टीम पोहोचली आहे. हॅरीचेही अनेक प्रकरणांमध्ये नाव आहे.
NIA crackdown on Khalistani-gangster network; Raids at 51 locations in 6 states including UP-Punjab and Rajasthan
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
- गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!
- भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??
- भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल