वृत्तसंस्था
चेन्नई : दहशतवादविरोधातील मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि ईडीने गुरुवारी सकाळी मोठी कारवाई केली. जवळपास 10 राज्यांमधील कट्टरतावादी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापे घातले. यात आत्तापर्यंत 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्नाटक, केरळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे.NIA and ED raids in 10 states against radical outfit PFI; More than 100 people were arrested
एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत करणा-या तसेच, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी असलेल्या निवासस्थानांची आणि अधिकृत ठिकाणांची झडती घेतल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत. तपास यंत्रणांनी राज्य पोलिसांच्या सहकार्याने सुमारे 10 राज्यांमध्ये 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे, अशी बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
याशिवाय एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकाशीसह अनेक ठिकाणी पीएफआय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. याशिवाय राजधानी चेन्नईतील पीएफआयच्या राज्य मुख्यालयातही झडती सुरू आहे.
नेत्यांच्या घरांवर छापेमारी
पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवर तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. यासोबतच यावेळी एजन्सींनी मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पक्षाचे अध्यक्ष सलाम पराड यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सलाम यांच्यावरील कारवाईविरोधात पक्ष कार्यकर्त्यांची निदर्शने सुरूच आहेत. गुरुवारी मोठ्या संख्येने जमलेल्या कामगारांनी घोषणाबाजी केली.
रविवारीही एनआयएने आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकले होते. त्यादरम्यान पीएफआय सदस्यांना चौकशीसाठी नेण्यात आले होते. तपास यंत्रणेने हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई केली होती.
NIA and ED raids in 10 states against radical outfit PFI; More than 100 people were arrested
महत्वाच्या बातम्या
- 2021 मध्ये अदानींनी दररोज कमावले 1612 कोटी : 2022च्या हुरून लिस्टमध्ये टॉपवर, अंबानींची रोजची कमाई 210 कोटी
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज भारत जोडो यात्रेत सामील होणार, कोचीमध्ये संध्याकाळी राहुल गांधींसोबत पत्रकार परिषद
- Wipro Action On Moonlighting : प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम केल्याचे आढळल्यानंतर विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!
- ड्रॅगनची चिंता वाढली : 2035 पर्यंत चीनमध्ये वृद्धांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त होणार