• Download App
    Violence In Bengal: हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित । NHRC constitutes 7 member committee to investigate incidents of Violence In Bengal After Elections, Calcutta High Court has given instructions

    Violence In Bengal : हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित

    Violence In Bengal : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठित केली आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. NHRC constitutes 7 member committee to investigate incidents of Violence In Bengal After Elections, Calcutta High Court has given instructions


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठित केली आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल कोलकाता हायकोर्टाने दिलेला आदेश मागे घेण्यासाठी दाखल करण्यात आलेली पुनरावलोकन याचिका फेटाळून लावली आहे. यासह कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला (एनएचआरसी) राज्य भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश परत दिले आहेत.

    सात सदस्यीय समिती गठित

    एनएचआरसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सात सदस्यांच्या समितीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आतिफ रशीद, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य राजुलबेन एल देसाई, पश्चिम बंगाल राज्य मानवाधिकार आयोगाचे कुलसचिव प्रदीपकुमार पंजा आणि एनएचआरसी सदस्य राजीव जैन यांचा समावेश आहे.

    NHRC constitutes 7 member committee to investigate incidents of Violence In Bengal After Elections, Calcutta High Court has given instructions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार