• Download App
    ज्ञानवापी परिसरात उरूस आणि मजारवर चादर चढवण्याच्या मागणीवर 11 ऑगस्टला पुढील सुनावणी|Next hearing on August 11 on the demand to put chadar on Urus and Mazar in Gyanvapi area

    ज्ञानवापी परिसरात उरूस आणि मजारवर चादर चढवण्याच्या मागणीवर 11 ऑगस्टला पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था

    लखनऊ : ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील मजारवर चादर चढवण्याच्या आणि उरूसाच्या मागणीवर सुनावणी आता 11 ऑगस्टला होणार आहे. हा खटला दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्रकुमार पांडे यांच्या कोर्टात सुरू आहे. बुधवारी या खटल्यातील पक्षकार राखी सिंग यांच्या वतीने आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्याची मागणी करून स्थगिती अर्ज देण्यात आला.Next hearing on August 11 on the demand to put chadar on Urus and Mazar in Gyanvapi area



    ती मान्य करत न्यायालयाने 11 ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. या खटल्यात ज्ञानवापीमध्ये उरूस करून मजारवर चादर चढवण्याची मागणी करण्यात आली आहे. लोहटा येथील रहिवासी मुख्तार अहमद अन्सारी, काचीबाग येथील रहिवासी अनिसूर रहमान आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करून राज्य सरकार, अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी, डीएम वाराणसी आणि सीपी वाराणसी यांना पक्षकार केले होते.

    ज्ञानवापी आवारात असलेल्या दृश्य-अदृश्‍य मजारीवर चादर अर्पण आणि फातिहा पठण करण्याबरोबरच वार्षिक उरूस आयोजित करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी त्यांनी एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती.

    Next hearing on August 11 on the demand to put chadar on Urus and Mazar in Gyanvapi area

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार