विशेष प्रतिनिधी
मुंबई : न्यूयॉर्क टाइम्स स्वतःला तटस्थ माध्यम म्हणून घेत असले तरी त्याच्या रिपोर्टिंग मधला दुटप्पीपणा उघड झाला आहे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात जेव्हा निवडणूक होती तेव्हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना न्यूयॉर्क टाईम्समध्ये “अतिरेकी” ठरवण्यात आले होते. तशा हेडलाईन्स छापण्यात आल्या होत्या. पण आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या राजवटीतल्या दहशतवाद्यांना न्यूयॉर्क टाईम्सने “दिग्गज नेते” म्हटले आहे. New York times played double game; appreciate Talibani as stalwarts but condemned Modi and Yogi as extremists
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये भाजपने निवडणुकीच्या मार्गाने लोकशाहीची तत्वे अवलंबत सत्ता मिळवली. तरी देखील न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या जोडीला “अतिरेकी” ठरवले आणि आज जेव्हा तालिबान्यांनी सशस्त्र संघर्ष करून अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली आहे तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स तालिबानी दहशतवाद्यांना “दिग्गज नेते” असे संबोधतो आहे.
तालिबानच्या राजवटीतील अनेक मंत्री हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या दहशतवाद्यांच्या यादीतले दहशतवादी आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी त्यांना दहशतवादी जाहीर केले आहे. जगभरातल्या हिंसक दहशतवादी कृत्यांमध्ये ते सामील झाले आहेत. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी इस्लामी शरिया कायदा लागू करून महिलांना मध्ययुगीन बंधनात टाकले आहे. अशा या तालिबानी दहशतवाद्यांना मात्र न्यूयॉर्क टाइम्स “दिग्गज नेते” असे संबोधतो.
भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर यांनी न्यूयॉर्क टाइम्सचा हा दुटप्पीपणा उघड केला आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्वतःला लोकशाहीवादी माध्यम समजतो. तटस्थ भूमिका घेण्याचा दावा करतो. परंतु त्याचे रिपोर्टिंग अशा स्वरूपाचे पक्षपाती आहे हे रहाटकर यांनी उघडकीस आणले आहे.
New York times played double game; appreciate Talibani as stalwarts but condemned Modi and Yogi as extremists
महत्त्वाच्या बातम्या