• Download App
    कोरोनाविरोधी लस घेण्यास नकार देणाऱ्या अमेरिकेच्या कंपनीतील १४०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी । New York State's largest healthcare provider, Northwell Health, has fired 1,400 employees who refused to get Covid-19 vaccinations, according to a spokesman, Joe Kemp.

    कोरोनाविरोधी लस घेण्यास नकार देणाऱ्या अमेरिकेच्या कंपनीतील १४०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने कोरोनाविरोधी लस घेण्यास नकार दिल्यामुळे १४०० कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखविला आहे. कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची जगभर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. New York State’s largest healthcare provider, Northwell Health, has fired 1,400 employees who refused to get Covid-19 vaccinations, according to a spokesman, Joe Kemp.

    नॉर्थवेल हेल्थ, असे कंपनीचे नाव आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कंपनी कार्यरत आहे. आरोग्य सेवा पुरविण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीच्या १४०० कर्मचाऱ्यांनी कोरोना विरोधी लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन संतप्त झाले.



    एकीकडे कंपनी नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत आहे. मात्र कंपनीचे कर्मचारीच आम्ही लस घेणार नाही, असे सांगू लागल्याने जनतेत कंपनीबाबत चुकीचा संदेश जात असल्याने व्यवस्थापन आणखी खवळलं आणि त्यांनी चक्क त्या १४०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. या घटनेचे जोरदार पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधी लस घेणार नाही, असे सांगणाऱ्या बंडखोर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याच्या वृत्ताला कंपनीचे प्रवक्ते जो केम्प यांनी दुजोरा दिला आहे.

    New York State’s largest healthcare provider, Northwell Health, has fired 1,400 employees who refused to get Covid-19 vaccinations, according to a spokesman, Joe Kemp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार