Sunday, 11 May 2025
  • Download App
    बदायूँतला सलून चालक साजिदची पत्नी सुखरूप, आजारी असल्याचे नाटक करूनच उसने मागितले पैसे, नंतर केली मुलांची हत्या!! new twist in the Badayun double murder case

    बदायूँतला सलून चालक साजिदची पत्नी सुखरूप, आजारी असल्याचे नाटक करूनच उसने मागितले पैसे, नंतर केली मुलांची हत्या!!

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : बदायूँ येथील दुहेरी हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. दोन निष्पाप मुलांची हत्या केल्यानंतर पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार झालेला सलून चालक साजिद, हत्या केलेल्या मुलांच्या घरी पत्नी आजारी आहे असे सांगत 5000 रुपये उसने घ्यायला गेला होता, पण त्याची पत्नी बरी आहे, ना ती रुग्णालयात दाखल आहे, ना ती गर्भवती आहे. अशा स्थितीत साजिदने वेगळेच कारस्थान रचून मुलांची हत्या का केली??, असा सवाल पुढे आला आहे. एका वृत्तवाहिनीने साजिदच्या दादमई येथील सासरच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. new twist in the Badayun double murder case

    साजिदची पत्नी सना म्हणाली की, आम्ही गेल्या १५ दिवसांपासून मी माझ्या आईच्या घरी आहे. मी गेल्या बुधवारी साजिदशी शेवटचे बोलले होते. माझ्याकडे फोन नाही आणि आईच्या फोनमध्ये रिचार्ज नव्हता, त्यामुळे आम्ही बोलू शकलो नाही. साजिदने असे का केले, मला माहिती नाही. सकाळी मोबाईलवर पाहिल्यानंतर मला ही घटना समजली.

    साजिदची सासू मिस्कीन यांनी सांगितले की, साजिदने मोठी चूक केली, पण त्याच्या एन्काऊंटर मुळे माझ्या मुलीचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझी मुलगी बरी आहे, तिला कोणताही आजार नाही. ती तुमच्या समोर आहे. आता साजिदने 5000 का मागितले??, हे कळत नाही.

    ही घटना मंगळवारी रात्री बदायूँतील मंडी समिती चौकीजवळील बाबा कॉलनीत असलेल्या विनोदच्या घरात घडली. साजिदने विनोद आणि संगीता यांच्या दोन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साजिदच्या मृत्यूमुळे गुन्ह्याचा उलगडा होण्याची आशा धूसर झाली आहे.

    या घटनेबद्दल मुलांच्या आईने काय सांगितले?

    मुलांची आई संगीता म्हणाली की, मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते, माझे पार्लरही आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि आधी क्लचर मागितला, तो दिला. त्यानंतर काही वेळाने त्याने 5000 रुपयांची मदत मागितली. मी माझ्या पतीशी बोलून त्याला 5000 रुपये दिले. तेव्हा त्याने तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आणि असे म्हणत तो गच्चीवर गेला.

    आयुष आणि युवराज ही दोन्ही मुले घराच्या टेरेसवर खेळत होती. मुलांच्या आजीने सांगितले की, साजिदने हनीला पाणी घेऊन बोलावले होते. हनी पाणी घेऊन वरच्या मजल्यावर गेला होता. काही वेळाने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू होता तो रक्ताने माखला होता.तसाच तो टेरेसवरून खाली उतरत होता.

    मुलांची आजी मुन्नी देवी यांनी सांगितले की, साजिदने त्याची सून संगीता हिला सांगितले होते की, त्याची पत्नी ॲडमिट आहे. माझी पाच मुलं गेली आहेत. यावेळी प्रसूतीसाठी पैशांची अडचण आहे. यानंतर सून संगीता हिने मुलाला फोन केला असता त्याने पैसे देण्यास सांगितले.

    सुनेने साजिदला सांगितले की,सगळं काही ठीक होईल, काळजी करू नको, ती त्याच्यासाठी चहा बनवायला आत गेली. यानंतर साजिद म्हणाला की, मला अस्वस्थ वाटत आहे मग तो टेरेसवर गेला. त्याने मोठ्या मुलाला सोबत नेले आणि तेथेच चाकूने वार करून त्याची हत्या केली.

    या घटनेबाबत मृत मुलांचे वडील विनोद यांनी सांगितले की, आमचे त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. तो न्हावी म्हणून काम करायचा. साजिद आणि जावेद हे दोघे सख्खे भाऊ होते. आम्हाला न्याय हवा आहे. जावेदला पकडले पाहिजे म्हणजे आमच्या मुलांना का मारले हे कळेल.

    new twist in the Badayun double murder case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vadodara : वडोदरामध्ये पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज