• Download App
    केवळ शंभर रुपयांत रॅपिड अँटिजेन चाचणी करणारे किट विकसित, लवकरच बाजारात मिळणार|New technology developed for antigen test

    केवळ शंभर रुपयांत रॅपिड अँटिजेन चाचणी करणारे किट विकसित, लवकरच बाजारात मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील आयआयटीमधील शास्त्रज्ञांनी ग्रामीण भागात उपयोगी पडणारे आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे रॅपिड अँटिजेन टेस्ट किट विकसित केले आहे.New technology developed for antigen test

    केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ‘आयआयटी’तील एका स्टार्टअपने हे किट विकसित केले आहे.या किटद्वारे दहा ते पंधरा मिनिटांत कोरोनाची चाचणी होईल.



    पॅथॉलॉजी तसेच चाचणी प्रयोगशाळांची कमतरता असलेला ग्रामीण भाग, डॉक्टर आणि मर्यादित वैद्यकीय साधने असलेल्या भागांमध्ये कोविड निदानासाठी हे किट उपयुक्त ठरेल.’’

    संक्रमण झाले की नाही, हे तपासण्यासाठी रुग्णांच्या नाकातील आणि घशातील स्त्रावांचे नमुने घेऊन ती प्रयोगशाळांकडे पाठवावी लागतात. मात्र, ग्रामीण भागात या सुविधा उपलब्ध नसतात.

    त्यामुळे या चाचणीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. या किटमुळे सामान्य लोकांना या किटमुळे दिलासा मिळेल.येत्या जून महिन्यापर्यंत ते उपलब्ध होणार असून, त्याची किंमत केवळ शंभर रुपयांपर्यंत असेल.

    ते प्रमाणित आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल. त्याद्वारे किमान दहा मिनिटात कोरोना संक्रमण झाले की नाही, याचा निष्कर्ष हाती येणार आहे.

    New technology developed for antigen test

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये