विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचे “विनायक जयंती”ला उद्घाटन केले आणि गणेश चतुर्थीला तेथून कामकाजाला सुरुवात होणार आहे. अशा रीतीने मोदी सरकारने गणपती बाप्पा मोरया केला आहे. New sansad started from ganesh chaturthi
मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी आयोजित केले आहे. यापैकी 18 सप्टेंबरची बैठक जुन्या संसद भवनात भरेल आणि 19 सप्टेंबर पासून नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर नव्या संसद भवनातच सर्व अधिवेशने भरतील.
जुन्या संसद रूपांतर लोकशाही संग्रहालयात करण्यात येणार असून त्यानुसार तेथे काही बदलही सुरू केले आहेत.
पण नव्या संसद भवनाचे वैशिष्ट्य असे, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीदिनी 28 मे 2023 रोजी केले, तर तेथून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्तावर होणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरवात होत असताना मोदी सरकारने मुद्दामून संसदेचे विशेष अधिवेशन त्याच दिवसांमध्ये बोलावले, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मात्र या आरोपाला भीक न घालता मोदी सरकारने विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही. उलट संसदेच्या नव्या संसदेच्या कामकाजाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्याचा निर्णय घेतला.
New sansad started from ganesh chaturthi
महत्वाच्या बातम्या
- गोविंदांच्या आनंदावर विरजण; यंदा दहीहंडी केवळ रात्री दहा वाजेपर्यंत
- हरियाणाच्या कर्नालमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी, एकमेकांविरोधात घोषणाबाजी
- द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज आसियान बैठकीसाठी इंडोनेशियात!!
- Chandrayaan-3 Mission : चंद्रावर स्लीपिंग मोडमध्ये असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र आले समोर , इस्रोने दिला मोठा अपडेट