विशेष प्रतिनिधी
पाटणा – जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांची जवळीक वाढली आहे. पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करा, जातीवर आधारित जनगणना करा या मागणीच्या आडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे.New political equations in Bihar
बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून काही घटना वेगाने घडत असून ते नवीन समीकरणाचे संकेत तर देत नाही ना, असा प्रश्नड विरोधी पक्षाबरोबरच भाजप आणि जेडीयू पक्षातील कार्यकर्त्यांना पडत आहे.
जातीवर आधारित जनगणनेच्या मुद्यावरून नितीशकुमार आणि तेजस्वी हे एकत्र आले आहेत. ही जवळीक एवढी वाढली आहे की त्यांनी तेजस्वी यादव यांचा एक सल्लाही मान्य केला आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटले की, केंद्र सरकारने जातीय जनगणना केली नाही तर केरळप्रमाणे बिहार सरकार देखील काम करू शकतो. हे कोणत्याही राज्याला शक्य आहे. या मताला दुजोरा देत नितीशकुमार यांनी तेजस्वी यांच्या सुरात सूर मिसळले. केंद्राने जातीनिहाय जनगणना केली नाहीत तर बिहारसाठी हा पर्याय खुला राहील, असे नितीशकुमारांनी स्पष्ट केले आहे.
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान आहोत, असे सांगणारे चिराग पासवान यांची भूमिका आता बदलल्याने राजकारणात तर्कवितर्क लावले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात दलित नेते रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आज मात्र ते नितीशकुमार यांचे निकटवर्तीय बनले आहेत. पासवान यांनी जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा दिला आहे.
New political equations in Bihar
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये यंदा विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थी शिकणार
- मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांना अंधारात ठेऊन सिध्दू यांनी केल्या चार सल्लागारांच्या नियुक्त्या
- माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार
- आरोग्याच्या सुविधा वाढल्याने निवृत्तीचे वय वाढवा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस