• Download App
    शेतकऱ्यांसाठी नवे धोरण जाहीर : वन नेशन, वन फर्टिलाइजर; भारत ब्रँड युरिया; पंतप्रधान मोदींची घोषणाNew policy announced for farmers: One Nation, One Fertilizer

    शेतकऱ्यांसाठी नवे धोरण जाहीर : वन नेशन, वन फर्टिलाइजर; भारत ब्रँड युरिया; पंतप्रधान मोदींची घोषणा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवे धोरण जाहीर केले आहे. शेतकऱ्यांसाठी “वन नेशन वन फर्टिलायजर” अर्थात संपूर्ण देशभर एकाच पद्धतीचे एकाच गुणवत्तेचे युरिया खत देण्याचे हे धोरण आहे. New policy announced for farmers: One Nation, One Fertilizer

    केंद्रीय कृषिमंत्रालयाने आयोजित केलेल्या शेतकरी सन्मान संमेलनात पंतप्रधान मोदींनी या नव्या धोरणाची घोषणा केली. देशभरातल्या छोट्या शेतकऱ्यांना मुक्तपणे शेती करता यावी, त्यांना स्वस्तात खते आणि औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी “वन नेशन वन फर्टिलायजर” हे धोरण असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. जगाच्या बाकीच्या देशातून युरिया आयात करताना तो 70 ते 80 रुपये किलो या दराने पडतो. परंतु, आपण शेतकऱ्यांना तो 5 ते 6 रुपये किलो दराने देतो. आता इथून पुढे एकाच भारत ब्रँड युरिया या नावाने शेतकऱ्यांना खत उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    केंद्र सरकारने यंदा युरिया खरेदीसाठी तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना युरिया स्वस्त दराने देण्याचा सरकारचा इरादा कायम आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याच वेळी त्यांनी देशात प्रामुख्याने खाद्यतेले, खनिज तेले, खते यांचा आयातीवरचा खर्च लाखो करोड रुपयांचा असल्याचे सांगून देशाला या तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर तिकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

    New policy announced for farmers: One Nation, One Fertilizer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू

    Sonam Wangchuk : केंद्राने सुप्रीम कोर्टात म्हटले- वांगचुक सीमावर्ती भागात लोकांना भडकावत होते, एखाद्या चिनी व्यक्तीने असे काही म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते