वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवे धोरण जाहीर केले आहे. शेतकऱ्यांसाठी “वन नेशन वन फर्टिलायजर” अर्थात संपूर्ण देशभर एकाच पद्धतीचे एकाच गुणवत्तेचे युरिया खत देण्याचे हे धोरण आहे. New policy announced for farmers: One Nation, One Fertilizer
केंद्रीय कृषिमंत्रालयाने आयोजित केलेल्या शेतकरी सन्मान संमेलनात पंतप्रधान मोदींनी या नव्या धोरणाची घोषणा केली. देशभरातल्या छोट्या शेतकऱ्यांना मुक्तपणे शेती करता यावी, त्यांना स्वस्तात खते आणि औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी “वन नेशन वन फर्टिलायजर” हे धोरण असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. जगाच्या बाकीच्या देशातून युरिया आयात करताना तो 70 ते 80 रुपये किलो या दराने पडतो. परंतु, आपण शेतकऱ्यांना तो 5 ते 6 रुपये किलो दराने देतो. आता इथून पुढे एकाच भारत ब्रँड युरिया या नावाने शेतकऱ्यांना खत उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने यंदा युरिया खरेदीसाठी तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना युरिया स्वस्त दराने देण्याचा सरकारचा इरादा कायम आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याच वेळी त्यांनी देशात प्रामुख्याने खाद्यतेले, खनिज तेले, खते यांचा आयातीवरचा खर्च लाखो करोड रुपयांचा असल्याचे सांगून देशाला या तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर तिकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
New policy announced for farmers: One Nation, One Fertilizer
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??