New Parliament building : नवीन संसदेशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, ‘नक्कीच आमचे लक्ष्य हे काम जास्त लवकर पूर्ण करण्याचे आहे. आम्ही प्रयत्न करू की, नवीन इमारत 15 ऑगस्ट (2022) पूर्वी बांधली जावी. स्वातंत्र्याची 75 वर्षे झाली की आपण हा सण नवीन इमारतीत साजरा करूया.” New Parliament building to be ready before August 15 next year Says Lok Sabha speaker Om Birla
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच पुढील वर्षी 15 ऑगस्ट रोजी नवीन संसदेमध्ये कामकाज सुरू होऊ शकते. वृत्तसंस्थेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हवाल्याने बुधवारी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर बिर्ला यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, नवीन संसदेशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, ‘नक्कीच आमचे लक्ष्य हे काम जास्त लवकर पूर्ण करण्याचे आहे. आम्ही प्रयत्न करू की, नवीन इमारत 15 ऑगस्ट (2022) पूर्वी बांधली जावी. स्वातंत्र्याची 75 वर्षे झाली की आपण हा सण नवीन इमारतीत साजरा करूया.”
यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. सभागृहात वादविवाद, मतभेद झालेले आहेत, परंतु सभागृहाचे पावित्र्य कधीही कमी झाले नाही. मी सर्व खासदारांना विनंती करतो की, सभागृह संसदीय परंपरेने चालवावे आणि त्याचा सन्मान राखला जावा. घोषणा आणि बॅनरबाजारी करणे हा आमच्या संसदीय परंपरेचा भाग नाही. त्यांनी त्यांच्या जागेवरून बोलावे.
सर्व पक्षांच्या नेत्यांचे आभार- बिर्ला
लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, सदन केवळ 74 तास आणि 46 मिनिटे चालले. ओबीसी विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आली, जी सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केली. मी पंतप्रधान आणि सभागृहात योगदान देणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांचे आभार मानतो.
बिर्ला म्हणाले की, यावेळी सतत अडथळे येत होते. ते सोडवता आले नाहीत. सभागृहातील कामकाजाचा प्रश्न आहे, तर गेल्या दोन वर्षांत अधिक काम झाले आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि कोविडच्या काळातही खासदारांनी सक्रिय योगदान दिले होते. ते म्हणाले की, मला दुःख वाटते की, या सत्रात सभागृहाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, मी नेहमी प्रयत्न करतो की, सभागृहात जास्तीत जास्त कामकाज व्हावे आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा व्हावी.
New Parliament building to be ready before August 15 next year Says Lok Sabha speaker Om Birla
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, “राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”
- “दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला
- आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांनाही होणार दंड, रिझर्व्ह बँकेने दिले हे निर्देश
- फुलसावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टरच्या ट्रायलवेळी दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांची मेहनत वाया, स्वप्नही भंगले
- बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती, 3466 पदांची भरती