• Download App
    सर्वसामान्यांना मोठा दिलासा, दुर्मिळ आजारात 20 लाख रुपयांपर्यंत मदत, राष्ट्रीय धोरण 2021ला केंद्राची मंजुरी । New national policy for rare diseases approved, will get 20 lakh rupees for treatment

    सर्वसामान्यांना मोठा दिलासा, दुर्मिळ आजारात २० लाख रुपयांपर्यंत मदत, राष्ट्रीय धोरण२०२१ला केंद्राची मंजुरी

    national policy for rare diseases : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुर्मिळ आजारांकरिता राष्ट्रीय धोरण 2020 ला मान्यता दिली आहे. औषधांच्या स्वदेशी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करून दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठीचा खर्च कमी करणे हे, याचे उद्दिष्ट आहे. शनिवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. New national policy for rare diseases approved, will get 20 lakh rupees for treatment


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुर्मिळ आजारांकरिता राष्ट्रीय धोरण 2020 ला मान्यता दिली आहे. औषधांच्या स्वदेशी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करून दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठीचा खर्च कमी करणे हे, याचे उद्दिष्ट आहे. शनिवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.

    राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेंतर्गत अशा दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी 20 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे, ज्यांचा समावेश या धोरणात गट 1 च्या यादीत आहे.

    अशा आर्थिक मदतीचा लाभार्थी केवळ बीपीएल कुटुंबांपुरता मर्यादित राहणार नाहीत, असेही आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. हा लाभ पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 40 टक्के लोकांपर्यंत वाढविण्यात येईल. निवेदनात म्हटले आहे की, दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी आर्थिक मदत आयुष्मान भारत पीएमजेवाय अंतर्गत नव्हे, तर राष्ट्रीय आरोग्य निधी (आरएएन) योजनेंतर्गत प्रस्तावित केली गेली आहे.

    याव्यतिरिक्त, या धोरणात क्राउड फंडिंग पद्धतीचाही विचार करण्यात आला आहे. यात कॉर्पोरेट्स आणि इतरांना दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी मजबूत आयटी प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक साहाय्य करण्यास प्रोत्साहित केले जाईल. मंत्रालयाने सांगितले, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 30 मार्च रोजी दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण 2021 ला मान्यता दिली आहे.

    New national policy for rare diseases approved, will get 20 lakh rupees for treatment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!