वृत्तसंस्था
अहमदाबाद : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच माता लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा छापावी, अशी मागणी करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात मध्ये नवा डाव टाकला आहे. आम आदमी पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा ऑप्शन गुजरातच्या जनतेवर सोपवला आहे. New move of Aam Aadmi Party in Gujarat;
भारतीय करन्सी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा प्रसिद्ध करण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल यांनी आधीच देशाच्या राजकारणात खळखळ उडवून दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे भाग पडले आहे. आता त्यापुढे जाऊन त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये वेगळी स्पर्धा निर्माण करण्यासाठी आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा ऑप्शन थेट लोकांकडूनच मागवला आहे.
यासाठी आम आदमी पार्टी एक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जारी करणार असून 3 नोव्हेंबर 2022 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत या मोबाईलवर नंबर वर किंवा ईमेल आयडीवर लोकांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चॉईस आम आदमी पार्टीला कळवायचा आहे. 4 नोव्हेंबर 2022 ला आम आदमी पार्टी लोकांनी निवडलेला मुख्यमंत्री पदाचा चॉईस जाहीर करणार आहे. सुरत मध्ये स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची ही नवी योजना जाहीर केली आहे.
केजरीवाल यांच्या या नव्या पवित्र्यानंतर सोशल मीडियावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्या आम आदमी पार्टीचे गुजरात विधानसभेत 10 आमदारही निवडून येणार नाहीत, ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार लोकांकडून मागत आहेत, अशा शब्दांत अनेकांनी केजरीवाल यांच्या सूचनेची खिल्ली उडवली आहे. करन्सी नोटांवर लक्ष्मी गणेशाची प्रतिमा छापण्याची मागणी करणारे केजरीवाल हे “चुनावी हिंदू” आहेत. बाकीच्या वेळी हिंदू धर्माचा द्वेष करणारे आहेत असे शरसंधानही अनेकांनी साधले आहे.
New move of Aam Aadmi Party in Gujarat;
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री
- Maha RERA recruitment : सरकारी नोकरीची संधी; ६५ हजारांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज
- नोटांवर लक्ष्मी – गणेशाच्या प्रतिमा : केजरीवालांनी आधी वक्तव्य करून आजमावल्या प्रतिक्रिया, आता लिहिले मोदींना पत्र