वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी शुक्रवारी संघटनेचे प्रदेश प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. वरिष्ठ नेते व्ही. मुरलीधर राव यांच्या जागी उत्तर प्रदेशचे महेंद्रसिंह यांच्याकडे मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी राहील. महाराष्ट्रातील नेते विनाेद तावडे यांच्याकडे बिहारची तर माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळची जबाबदारी दिली. तर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर प्रभारीपद देण्यात आले आहे. New in-charges from BJP in 24 states, BJP handed over the responsibility of Bihar, while Javadekar has Kerala
दिल्लीचे सतीश उपाध्याय मध्य प्रदेशचे सहप्रभारी असतील. राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष सतीश पुनिया यांच्याकडे हरियाणाची धुरा असेल. हरियाणात याच वर्षी विधानसभा निवडणूक आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस राधामाेहनदास अग्रवाल कर्नाटक, विनाेद तावडे-बिहार, तरुण चुघ जम्मू-काश्मीर, लडाख, दुष्यंत गाैतम उत्तराखंडच्या प्रभारीपदी कायम राहतील. आशिष सूद -गाेवा, श्रीकांत शर्मा-हिमाचल, लक्ष्मीकांत वाजपेयी-झारखंड, विजयपाल ताेमर-आेडिशाचे प्रभारी असतील.
आमदार श्रीकांत शर्मा हिमाचल प्रदेशचे प्रभारी असून, संजय टंडन सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. तरुण चुघ यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी तर आशिष सूद यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. खा. लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. डॉ. राधामोहनदास अग्रवाल यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारी म्हणून तर सुधाकर रेड्डी यांच्याकडे सहप्रभारी म्हणून दायित्व देण्यात आले. राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे यांना मणिपूरचे तर, रघुनाथ कुळकर्णी यांना अंदमान निकोबारचे प्रभारी म्हणून उत्तरदायित्व देण्यात आले.
New in-charges from BJP in 24 states, BJP handed over the responsibility of Bihar, while Javadekar has Kerala
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले; ज्या राजभवनात अटक केली, तिथेच 156 दिवसांनी घेतली शपथ
- टीम इंडियाला मिळाला असा सन्मान जो आजपर्यंत ना कोणत्या पंतप्रधानांना मिळा ना मुख्यमंत्र्यांना!
- हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!
- अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये’