• Download App
    पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध |New grah find in space

    पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील भौतिकी प्रयोगशाळेने हा नवा ग्रह शोधला आहे.New grah find in space

    हा नवा ग्रह एच.डी.८२१३९ नावाच्या ताऱ्याभोवती फिरतो. टीओआय कॅटलॉगनुसार ग्रहाचे नाव १७८९ बी तर हेन्री ड्रेपर कॅटलॉगनुसार एचडी ८२१३९बी आहे. गुरू ग्रहाच्या तुलनेत वस्तुमान ७० टक्के आणि आकार १.४ पटीने जास्त असून ताऱ्याभोवती फिरण्याचा कालावधी फक्त ३.२ दिवसांचा आहे



    डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान यासंबंधी निरीक्षणे घेण्यात आली होती. जर्मनी येथील टीसीईएस स्पेक्ट्रोग्राफने एप्रिल २०२१मध्ये, तसेच माउंट अबू येथील प्रयोगशाळेने या शोधाची पुष्टी केली आहे. अहमदाबाद येथील शास्रज्ञांचा गट अशा बाह्यग्रहांचा शोध घेत असून, २०१८ मध्ये त्यांनी शनीच्या आकाराचा के२-२३६ या बाह्यग्रहाचा शोध घेतला होता.

    New grah find in space

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू