विशेष प्रतिनिधी
बंगळूर – पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील भौतिकी प्रयोगशाळेने हा नवा ग्रह शोधला आहे.New grah find in space
हा नवा ग्रह एच.डी.८२१३९ नावाच्या ताऱ्याभोवती फिरतो. टीओआय कॅटलॉगनुसार ग्रहाचे नाव १७८९ बी तर हेन्री ड्रेपर कॅटलॉगनुसार एचडी ८२१३९बी आहे. गुरू ग्रहाच्या तुलनेत वस्तुमान ७० टक्के आणि आकार १.४ पटीने जास्त असून ताऱ्याभोवती फिरण्याचा कालावधी फक्त ३.२ दिवसांचा आहे
डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान यासंबंधी निरीक्षणे घेण्यात आली होती. जर्मनी येथील टीसीईएस स्पेक्ट्रोग्राफने एप्रिल २०२१मध्ये, तसेच माउंट अबू येथील प्रयोगशाळेने या शोधाची पुष्टी केली आहे. अहमदाबाद येथील शास्रज्ञांचा गट अशा बाह्यग्रहांचा शोध घेत असून, २०१८ मध्ये त्यांनी शनीच्या आकाराचा के२-२३६ या बाह्यग्रहाचा शोध घेतला होता.
New grah find in space
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची गुपिते : अस्वलांना प्रचंड बर्फातदेखील का वाजत नाही थंडी
- इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद, तुमच्या मुलांना सीमेवर पाठवा, गौतम गंभीरने नवज्योतसिंग सिध्दूला सुनावले
- विज्ञानाची डेस्टीनेशन्स : अंडी उकडणारा जादुई बॉक्स, आता पाण्याशिवायही अंडी उकडली जाणार
- मेंदूचा शोध व बोध : शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात डाव्या मेंदूवरच अधिक भर