उपराज्यपालांनी ट्वीटद्वारे दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आता, शनिवारी रात्री राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही अशीच घटना घडली. महाकुंभ मेळ्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.
ट्रेन रद्द झाल्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये जवळपास दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे १५ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. मात्र मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुरू केले.
तर दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे ज्यामध्ये गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळे लोकांचे प्राण गेले आहेत आणि काही जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सामील आहे.
Stampede at New Delhi railway station more than ten dead, many injured
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…