• Download App
    Dnyanesh Kumar नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

    Dnyanesh Kumar : नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

    Dnyanesh Kumar

    मतदारांना दिला हा खास संदेश, जाणून घ्या काय म्हणाले?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: Dnyanesh Kumar  देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मतदारांना संदेशही दिला. त्यांनी त्यांच्या संदेशात लिहिले की, ‘मतदान हे राष्ट्रसेवेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. म्हणून, १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि मतदान केले पाहिजे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदे, त्याअंतर्गत जारी केलेले नियम आणि कायदे यांच्यानुसार. निवडणूक आयोग मतदारांसोबत होता, आहे आणि नेहमीच राहील.Dnyanesh Kumar



    देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात, ते या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका, २०२६ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा, केरळ, तामिळनाडू विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सांभाळतील.

    ज्ञानेश कुमार मार्च २०२४ पासून निवडणूक आयुक्त म्हणून काम करत होते आणि सोमवारी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली. राजीव कुमार मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी, ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुखबीर सिंग संधू हे निवडणूक आयुक्त आहेत, तर विवेक जोशी यांची सोमवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

    New Chief Election Commissioner Dnyanesh Kumar takes charge

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार