वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आर्मी कॉम्बॅट पॅटर्न युनिफॉर्म विषयी सोशल मीडियातून खोडसाळ प्रचार करण्यात आला आहे. लष्कराच्या गणवेशात विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेतील दहशतवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात एलटीटीई याच्या तथाकथित युनिफॉर्मशी काहीही संबंध नाही, असा स्पष्ट खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. New Army combat pattern uniform is distinctively different from the erstwhile LTTE
लष्कराच्या गणवेशात विविध स्वरूपाचे अधिकृत बदल करण्यात आले आहेत. त्यासंबंधीची नवीन नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणवेशाचा पॅटर्न असलेले कापड अथवा गणवेश सर्वसामान्यपणे बाजारात उपलब्ध होणार नाहीत तर लष्कराच्या स्टोअर मध्येच उपलब्ध होतील, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
परंतु गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर लष्कराच्या गणवेश याविषयी विशेषतः आर्मी कॉम्बॅट पॅटर्न युनिफॉर्म विषयी खोडसाळ प्रचार सुरू झाला आहे. भारतीय लष्कराचा हा गणवेश लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या दहशतवादी संघटनेच्या तथाकथित युनिफॉर्म वरून घेतला आहे, असा दावा करण्यात आला आहे. परंतु संरक्षण मंत्रालयाने प्रत्यक्ष गणवेशाची तुलनात्मक छायाचित्रे प्रसिद्ध करून यासंदर्भात खुलासा केला आहे. भारतीय लष्कराच्या गणवेशाशी एलटीटीई या दहशतवादी संघटनेच्या तथाकथित गणवेशाची काहीही संबंध नाही, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
New Army combat pattern uniform is distinctively different from the erstwhile LTTE
महत्त्वाच्या बातम्या
- Punjab Election 2022 : ‘आप’कडून टेली व्होटिंग सुरू, मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा निवडण्यावर जनतेकडून अभिप्राय
- वडगाव मावळ मध्ये अतुल भातखळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक , जोडे मारो आंदोलन करण्यात आले
- Income Tax Refund : करदात्यांना मोठा दिलासा, कर विभागाकडून 1,54,302 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा जारी
- WATCH : संगमनेरच्या गाईची राज्यामध्ये चर्चा एक लाख एकतीस हजारांचा भाव ; शेतकरी मालामाल