• Download App
    देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास |New aircraft carries PM Modi directly in USA

    देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अनेक वर्षांपासून अमेरिकेला जाणारे भारताचे पंतप्रधान जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात थांबत असत आणि तेथून अमेरिकेकडे प्रयाण करत असत. परंतु यंदा असे घडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोठेही न थांबता थेट न्यूयॉर्कला १३ तासाच्या दीर्घ प्रवास करत उतरले.New aircraft carries PM Modi directly in USA

    अत्याधुनिक एअर इंडिया वन या विमानामुळे हे शक्य झाले. हे विमान नुकतेच एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले आहे. एअर इंडिया वन हे ९०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करते. सर्वात सुरक्षित असणारे विमानाच्या पुढील भागात जॅमर असून ते शत्रूचे सिग्नल निष्प्रभ करते.



    या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम होत नाही. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता या विमानात आहे.भारताच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी तयार केलेले विमान एअर इंडिया वन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सेवेत आहे.

    गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यांत या विमानाचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. या विमानासाठी सुमारे ४५०० कोटी रुपये खर्च आला आहे. या विमानाचे वैशिष्ट्ये म्हणजे लांब पल्ल्याचा प्रवास हा कोठेही न थांबता पूर्ण करत येतो. यासाठी हवेतच तेल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

    New aircraft carries PM Modi directly in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!