• Download App
    केरळमधील एका शाळेमध्ये न्यूट्रल जेंडर युनिफॉर्म सुरू करण्यात आला | Neutral Gender Uniforms were introduced in a school in Kerala

    केरळमधील एका शाळेमध्ये न्यूट्रल जेंडर युनिफॉर्म सुरू करण्यात आला

    विशेष प्रतिनिधी

    वलयाणचिरंगा : केरळमधील एका शाळेमध्ये न्यूट्रल जेंडर युनिफॉर्म सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी शर्ट अन् थ्री फोर्थ ट्राऊझर्स घालू शकतात. मुली आणि मुले हाच युनिफॉर्म घालू शकतात. असा युनिफॉर्म सुरू करणारी भारतातील ही एकमेव शाळा आहे.

    Neutral Gender Uniforms were introduced in a school in Kerala

    एर्नाकुलम जिल्ह्यातील पेरुमबावूरच्या शेजारी असलेल्या गव्हर्मेंट लोअर प्रायमरी स्कूल, वलयाणचिरंगा येथील शाळेने हा उपक्रम चालू केला आहे. हा उपक्रम तसा 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. पण आता सध्या याची नोंद घेण्यात आली आहे. त्या वेळच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी ANI सोबत बोलताना सांगितले की, हा उपक्रम चालू करण्यामागे जेंडर इक्वॅलिटी हा एक मुख्य मुद्दा होता. जो आम्हाला शाळेमध्ये लागू करायचा होता. त्यामुळे युनिफॉर्म मध्येच इक्वॅलिटी आणली जावी असा विचार आला. आम्ही शाळेमध्ये मिटींग घेतली. 90% पालकांना याविषयी कोणतीही अडचण नव्हती. मुलेदेखील खूश होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता. तसेच मुलींना देखील स्कर्ट सारख्या युनिफॉर्ममध्ये बरेच प्रॉब्लेम्स यायचे. हे सर्व प्रॉब्लेम्स दूर होणार होते. म्हणून हा उपक्रम आम्ही चालू केला आहे.


    Gender equality in warfare; भारतीय सैन्य दलात स्त्रीशक्तीचे वाढते योगदान; संरक्षण खात्याकडून महत्त्वाची पावले


    या शाळेने चालू केलेला हा उपक्रम पाहून बऱ्याच शाळा यांच्यापासून प्रेरणा घेण्यास उत्सुक आहेत.

    Neutral Gender Uniforms were introduced in a school in Kerala

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!