• Download App
    रेंज मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी मुले पोहोचली जंगलातील डोंगरावर!।Network issue in rural part of Himachal pradesh

    रेंज मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी मुले पोहोचली जंगलातील डोंगरावर!

    विशेष प्रतिनिधी

    सिमला : इंटरनेट नेटवर्क फारसे चांगले नसल्याने हिमाचल प्रदेशात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी घर सोडून थेट डोंगर गाठावा लागत आहे. ऊन असो किंवा पाऊस असो, मुले डोंगरावर ऑनलाइन शिक्षण घेताना दिसतात. Network issue in rural part of Himachal pradesh

    सिमला जिल्ह्यातील गरागव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत. दुर्गम भाग, पर्वतरांगा तसेच अपुऱ्या व्यवस्थेमुळे हिमाचलच्या अनेक भागात मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. मग मुलांनी शिकायचे तरी कसे.



    मग शोध सुरू होतो तो नेटवर्क असलेल्या ठिकाणांचा. ज्या ठिकाणी चांगले नेटवर्क मिळते तेथे गावातील सर्व मुले जावून अभ्यास करतात. गावातील पालक मुलांना डोंगरावर घेऊ जातात आणि तेथे त्यांचा वर्ग होईपर्यंत थांबतात.

    ऊन असो किंवा पाऊस असो, मुले डोंगरावर ऑनलाइन शिक्षण घेताना दिसतात. कोटखाईच्या गरागव गावात तर मुले जंगलात दोन किलोमीटर अंतरावरील डोंगरात जातात. गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असून त्यांना नेटवर्कसाठी अनेकदा डोंगरावर जावे लागले आहे. सध्या तर दहा ते पंधरा दिवसांपासून चांगले नेटवर्क नसल्याने शिक्षण घेताना अडचणी येत असल्याचे पालकांनी बोलून दाखवले. या ठिकाणी बीएसएनएलचे एकच टॉवर आहे. परंतु सिग्नल नावापुरतेच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

    Network issue in rural part of Himachal pradesh

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही