विशेष प्रतिनिधी
पोर्ट ब्लेअर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.Netaji Bose, Sardar Patel did not get enough respect, Amit Shah lamented
अंदमान आणि निकोबार येथेनेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर एका जनसभेला संबोधित करताना शाह म्हणाले, “जेवढा सन्मान नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही. पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आणि अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले.
आम्ही स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही.
शाह म्हणाले, भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती परक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. मी या देशातील सर्व युवकांना विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या.
Netaji Bose, Sardar Patel did not get enough respect, Amit Shah lamented
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!
- अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
- एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी