• Download App
    नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेवर अत्याचाराचा आरोप, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल|Nepal captain Sandeep Lamichhane accused of torture, 17-year-old minor girl accused, case filed by police

    नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेवर अत्याचाराचा आरोप, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था

    काठमांडू : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर एका 17 वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे.सध्या या प्रकरणाची चोकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडू येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लामिछानेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो केनियामध्ये नेपाळकडून क्रिकेट खेळत आहे.Nepal captain Sandeep Lamichhane accused of torture, 17-year-old minor girl accused, case filed by police

    22 वर्षीय लामिछाने हा IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सहभागी झाला होता. भविष्यातील चागंला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिजे जात होते.



    IPL मध्ये घेतल्या आहेत 13 विकेट

    संदीप हा लेगस्पिनर असून IPL मध्ये खेळणारा तो नेपाळचा पहिलाच खेळाडू आहे. लामिछानेने IPL च्या 9 सामन्यात त्याने13 विकेट घेतल्या आहेत. लामिछानेने 2018 साली दिल्लीकडून इंडियन लीगमध्ये पदार्पण केले.

    उजव्या हाताचा हा गोलंदाज 20 लाखांना बेस किंमतीत विकला गेला. 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये संदीपने चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी नेपाळचा संघ विश्वचषकात 8व्या क्रमांकावर होता.

    4 वर्षांच्या इंटरनॅशनल करिअरमध्ये 23 संघांकडून खेळला आहे

    संदीप आपल्या 4 वर्षांच्या इंटरनॅशनल करिअरमध्ये 23 संघांकडून खेळला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाच्या लीग व्यतिरिक्त जगभरातील इतर महत्वाच्या लीगमध्येही त्याचा सहभाग आहे..

    संदीपने नेपाळकडून आतापर्यंत 30 वनडे आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 30 वनडे सामन्यांमध्ये 69 आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 85 बळी आहेत.

    136 T-20 मध्ये घेतल्या आहेत 193 विकेट

    वेगवेगळ्या लीग आणि टूर्नामेंटमध्ये, संदीपने जगभरातील लीगमध्ये एकूण 136 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 193 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन आणि लिस्ट-ए मध्ये 115 विकेट्स आहेत.

    Nepal captain Sandeep Lamichhane accused of torture, 17-year-old minor girl accused, case filed by police

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे