• Download App
    मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे|Neither the midterms nor the election will be delayed; Union Minister Anurag Thakur rejected the opposition's claims

    मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात, अशी शक्यता वाढली आहे. तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सार्वत्रिक निवडणुका वेळेपूर्वी घेण्याची शक्यता वर्तवली आहे. तथापि, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व शक्यता फेटाळून लावत सांगितले की, सार्वत्रिक निवडणुका वेळेपूर्वी किंवा नंतर घेण्याचा सरकारचा कोणताच हेतू नाही. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत देशाची आणि जनतेची सेवा करायची आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडीच्या नेत्यांनी एक देश एक निवडणूक देशाच्या संघीय रचनेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.Neither the midterms nor the election will be delayed; Union Minister Anurag Thakur rejected the opposition’s claims



    ठाकूर म्हणाले, भाजप दीर्घकाळापासून एक निवडणुकीच्या समर्थनात आहे. यामुळे वेळ व पैसा वाचेल. त्याचा उपयोग सरकार देशाच्या विकासासाठी करेल.

    हे संघराज्य रचनेच्या विरोधात : राहुल गांधी

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक ही कल्पना संघ व राज्यांवर हल्ला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, हे भाजपचे षड््यंत्र आहे.

    Neither the midterms nor the election will be delayed; Union Minister Anurag Thakur rejected the opposition’s claims

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले